climate change health issues cold cough doctor clinic hospital
climate change health issues cold cough doctor clinic hospitalSakal

Climatic Changes Affect Health : सर्दी-पडशाने सर्वसामान्यांचे हाल बेहाल; तापमानातील बदलाचा फटका, दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी

गेल्या काही दिवसापासून हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे सर्वत्र अबाल वृद्ध सर्दी पडशाने हैराण झाले असून सर्दी सोबतच तापही येत असल्यामुळे दवाखाने मात्र हाऊसफुल झाले आहेत.

परभणी : गेल्या काही दिवसापासून हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे सर्वत्र अबाल वृद्ध सर्दी पडशाने हैराण झाले असून सर्दी सोबतच तापही येत असल्यामुळे दवाखाने मात्र हाऊसफुल झाले आहेत.

गेल्या काही दिवसापासून सर्वसामान्यपणे दिवसाच्या तापमानात अचानक वाढ झाली. पहाटेच्यावेळी काहीशी थंडी तर दुपारी प्रंचड उष्णता यामुळेच सर्व सामान्याच्या शरीरावर विपरित परिणाम होऊन सर्दी,

ताप, डोकेदुखी, अंगदुखी या सारख्या आजारांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषता सर्दीमुळे सर्वसामान्याचे बेहाल झाले आहेत. तापमानाच्या या विषमतचे फटका लहान मुलांसह वृद्धांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. या सर्दी पडशामुळे दवाखाने मात्र हाऊसफुल झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

सर्दी, तापाचे रुग्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यासाठीच्या औषधींच्या विक्रीत वाढ झाली आहे. सिनारेस्ट, टेस्टीमॉल प्लस या गोळ्या सर्दीवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून मेडिकलवर मागितल्या जात आहेत. तर ताप, अंगदुखीसाठी खात्रीची पॅरासिटीमॉलची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्दी, तापाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे डॉक्टरांनीही म्हटले आहे.

सर्दीमुळे सिनारेस्ट, फेब्रेक्स प्लस, टेस्टीमॉल प्लस या सारख्या गोळ्याचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच ताप व अंगदुखीसाठी पॅरासिटीमॉलच्या ही विक्रीत वाढ झाल्याचे दिसते. परंतू कोणत्याही रुग्णांने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मनाने औषधी घेवू नयेत. अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतो.

— प्रा. बालाजी रेवणवार, साई मेडीकल, परभणी

सध्या वातावरणात बदलल्यामुळे ताप, सर्दी, कफ, अंगदुखी, डोकेदुखी यांचे प्रमाण जास्त आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरातील एका मागोमाग एक सर्वच सदस्यांना संसर्ग होत आहे.

— डॉ. श्रीपाद धानोरकर, फिजिशियन, परभणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com