तर काय?

मी आपले लेख नेहमी वाचतो आणि आपण सांगितलेल्या मार्गदर्शनाचा संपूर्ण परिवाराला चांगला उपयोग होतो.
ayurvedic treatment
ayurvedic treatmentsakal
Updated on

मी आपले लेख नेहमी वाचतो आणि आपण सांगितलेल्या मार्गदर्शनाचा संपूर्ण परिवाराला चांगला उपयोग होतो. मला गेले १-२ महिने सर्दीचा खूप त्रास होतो आहे. डॉक्टरांना दाखवून ॲलोपॅथिक व आयुर्वेदिक अशी दोन्ही प्रकारची औषधे घेतली, मात्र म्हणावा तसा उपयोग झालेला नाही. एका डॉक्टरांच्या मतानुसार नाकाचे हाड तिरके आहे व त्यासाठी शस्त्रकर्म करणे भाग आहे. काय उपाय करता येईल, हे कृपया सांगावे.

- अनिल पाटील, कोल्हापूर

उत्तर - नाकाचे हाड तिरके असल्यामुळे बऱ्याच लोकांना वरचेवर सर्दीचा त्रास होतो असे दिसते. पण याची शस्त्रक्रिया झाल्यावरसुद्धा खूप लोकांना म्हणावा तसा फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार करून शरीराची ताकद वाढवली व पित्ताचे संतुलन झाले तर अशा प्रकारचा त्रास आपसूक कमी होतो असे दिसते. रोज रात्री झोपताना नस्य सॅन घृतासारखे औषधी तूप २-३ थेंब या प्रमाणात नाकात घालावे.

जमत असल्यास हेच घृत दिवसातून आणखी १-२ वेळा नाकात घालणे उत्तम राहील. संतुलनच्या प्रवाळ पंचामृत मोतीयुक्त या गोळ्या, आत्मप्राश वा सॅन रोझसारखे रसायन घेणे श्रेयस्कर राहील. रोज एक चमचा संतुलनचे सितोपलादी चूर्ण एक ग्लास पाण्यात मिसळून ठेवून व दिवसभरात अधून मधून २-२ घोट घेण्याचा फायदा अनेकांना होताना दिसतो. शक्य झाल्यास एकदा संतुलनच्या तज्ज्ञांना प्रकृती दाखवल्यास व्यवस्थित औषधोपचार तसेच नस्यासारखे काही उपचार करण्याची गरज आहे का हे कळू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com