Side Effects Of Cold Drinks : कोल्डड्रिंक्स आवडीने पिताय? मग, जाणून घ्या 'हे' दुष्परिणाम

कोल्डड्रिंक्सचे जास्त प्रमाणात सेवन करणे, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Side Effects Of Cold Drinks :
Side Effects Of Cold Drinks :esakal

Side Effects Of Cold Drinks : उन्हाळा असो किंवा हिवाळा कोणताही ऋतु असला तरी देखील कोल्डड्रिंक्सचे सेवन हमखास केले जाते. मागील काही वर्षांमध्ये कोल्डड्रिंक्स पिण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. कोणतेही फंक्शन असुद्या किंवा छोटीशी पार्टी प्रत्येक ठिकाणी कोल्डड्रिंक्सचा पर्याय हमखास ठेवला जातो.

मात्र, हे कोल्डड्रिंक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे? हे तुम्हाला माहित आहे का? कोल्डड्रिंक हे फार आवडीने पिले जाणारे पेय आहे. तरूणाईला तर दिवसेंदिवस या कोल्डड्रिंक्सचे व्यसन लागले आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

कोल्डड्रिंक्सचे जास्त प्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. आज आपण कोल्डड्रिंक्स पिल्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Side Effects Of Cold Drinks :
Health Care : हात थरथरण्याला कारण आहे 'या' खास व्हिटॅमिनची कमतरता; आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

पोटाची चरबी वाढते

कोल्डड्रिंक्सचे अतिप्रमाणात सेवन करणे, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कोल्डड्रिंक्स पिल्याने पोटाच्या आसपास चरबीचे प्रमाण वाढते. साठलेली चरबी वाढली की, आपोआप वजन वाढते. तसेच, यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे, कोल्डड्रिंक्सचे अतिसेवन करणे टाळा.

इन्सुलिन असंतुलित होते

कोल्डड्रिंक्सचे अतिसेवन केल्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन असंतुलित होते. इन्सुलिन हे एक प्रकारचे हार्मोन आहे. हे हार्मोन आपल्या रक्तप्रवाहातून ग्लुकोजला पेशींमध्ये नेण्याचे काम करते.

त्यामुळे, जेव्हा गोड सोडा पिला जातो, तेव्हा आपल्या रक्तातील पेशी इन्सुलिन प्रती कमी संवेदनशील होऊ शकतात. त्यामुळे, कोल्डड्रिंक्स पिल्याने इन्सुलिनचे कार्य असंतुलित होते.

मधुमेहाचा धोका

कोल्डड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखरेचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे, जेव्हा या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते, तेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे, मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

संशोधनानुसार, कोल्डड्रिंक्स आणि सॉफ्टड्रिंक्सचे अतिप्रमाणात सेवन केल्याने लोकांना याचे व्यसन लागू शकते. त्यामुळे, या गोष्टींपासून जितके लांब राहण्याचा प्रयत्न करालं, तितके आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Side Effects Of Cold Drinks :
Green Peas Health Benefits : मधुमेह आणि त्वचेसाठी लाभदायी आहे मटार; जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com