

Complex Spine Surgeries Made Precise with 3D Planning and Robotic Guidance: Dr. Ajay Kothari
Sakal
डॉ. अजय कोठारी, स्पाइन सर्जन
‘‘डॉक्टर, इतका वाकलेला कणा... एवढ्या मणक्यांमध्ये स्क्रू... हे ऑपरेशन खरंच शक्य आहे का?’’
गुंतागुंतीच्या कण्याच्या आजाराचा रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांच्या मनात हा प्रश्न येणं अगदी स्वाभाविक आहे. कारण काही स्पाइन शस्त्रक्रिया साध्या नसतात. कण्याचा आकार बदललेला असतो, काही मणके सरकलेले असतात, अनेक ठिकाणी स्क्रू बसवावे लागतात आणि नसांसारख्या अतिशय संवेदनशील रचनांच्या आसपास काम करावं लागतं. अशा वेळी शस्त्रक्रियेच्या आधीच प्रत्येक पाऊल विचारपूर्वक ठरवावं लागतं.