फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

WHAT IS COPD: सतत खोकला, घरघर किंवा धाप लागणे ही COPD ची लक्षणे असू शकतात. धूम्रपान, प्रदूषण आणि धुळीमुळे फुफ्फुसांवर होणारा परिणाम जाणून घ्या.
WHAT IS COPD

WHAT IS COPD

sakal

Updated on: 

फुप्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात वाढत आहे. श्‍वास घेण्यात येणारा अडथळा हा क्रॉनिक ऑब्स्टक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) या गंभीर आजाराचे लक्षण असून यामुळे आजाराचा झटका येऊ शकतो. तर अतिधुम्रपानामुळे दर लाखात दोघांचे फुप्फुस या आजाराने आकुंचन पावते. आज आठ ते दहा लाख जण याचे रुग्ण आहेत, असे निरीक्षण श्‍वसनरोग तज्ज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांनी नोंदविले. जागतिक फुफ्फुस दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फुफ्फुसविकार, अतिदक्षता व निद्राविकार विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, धूम्रपानाबरोबरच वायुप्रदूषण, धूळ, धूर आणि व्यावसायिक स्वरूपातील घातक घटकांचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. प्रदूषित हवेचा परिणाम केवळ फुफ्फुसांपुरता मर्यादित नाही, तर हृदयविकार आणि स्ट्रोकशी संबंध आहे. दीर्घकाळ खोकला, घरघर किंवा धाप लागणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.

करावे झोपेचे मूल्यांकन क्षयरोग बरा झाल्यानंतरही काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांमध्ये कायमस्वरूपी बदल राहू शकतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार फुफ्फुसांचे तपासणी करणे महत्त्वाचे आहे. तंबाखू टाळावा, निष्क्रिय धूम्रपानापासून बचाव, स्वच्छ हवा, नियमित व्यायाम, वजन व मधुमेह नियंत्रण आणि पुरेशी झोप घ्यावी. जोखीम असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्पायरोमेट्री, झोपेचे मूल्यांकन करून घ्यावे असे डॉ. मेश्राम म्हणाले. दर एक लाख लोकसंख्येमध्ये दोघांचे फुप्फुस या आजाराने आकुंचन पावते. देशात लोकसंख्येच्या सरासरीनुसार सध्या साडेसात लाख व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत.

दिवसातून हजारो वेळा श्वास घेतो; मात्र सहज प्रक्रियेमागे फुफ्फुसांचे मोठे योगदान असते. फुफ्फुसांचे आरोग्य केवळ श्वसनापुरते मर्यादित नाही. त्याचा थेट संबंध हृदय, मेंदू, झोप, स्नायूशी आहे. सिगारेट किंवा बिडीमुळे फक्त फुफ्फुसांचे आजारच होतात असे नाही तर एंफिसेमा, सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्यचीही भीती आहे. -डॉ. सुशांत मेश्राम, प्राध्यापक, श्‍सवनरोग विभाग, मेडिकल-सुपर स्पेशालिटी, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com