कोरोनामुळे पुरुषांचे Sperm cells होतात कमी; काय आहे नेमकं कारण, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus alters proteins in the sperm cells thereby affecting fertility

कोरोनामुळे पुरुषांचे Sperm cells होतात कमी; काय आहे नेमकं कारण, जाणून घ्या

मुंबई: कोरोनाच्या SARS-CoV-2 व्हायरसमुळे केवळ हार्ट आणि न्यूरोलॉजिकल लक्षणेच उद्भवत नाहीत, तर IIT बॉम्बे प्रोटीओमिक्स प्रयोगशाळा आणि जसलोक हॉस्पिटलच्या नवीन संयुक्त अभ्यासात याचा परिणाम पुरुषांच्या शुक्राणूंवर देखील होतो, असे दिसून आले आहेत. (Corona virus alters proteins in the sperm cells thereby affecting fertility)

हेही वाचा: मनोरुग्ण महिलेवर बलात्कार; गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड

जसलोक हॉस्पिटलमधील डॉ. फिरोजा पारीख आणि IIT बॉम्बे येथील प्रोटीओमिक्स प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. संजीव श्रीवास्तव यांच्या संयुक्त अभ्यासात कोरोनामुळे शुक्राणूंच्या पेशींमधील प्रथिने विपरितपणे बदलते आणि त्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

हेही वाचा: तुम्हीही चालायला जाता का? जाणून घ्या चालण्याचा योग्य वेग काय असावा?

काही दिवसांपूर्वी 'जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी' मध्ये अभ्यासासाठी संशोधन पथकाने 20-45 वयोगटातील 27 पुरुषांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. 17 जे कोविडमधून बरे झाले होते आणि इतर 10 जणांना कोरोना झाला नव्हता. त्यांच्यापैकी कोणालाही याआधी वंध्यत्व नव्हते.

बरे झालेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली असल्याचे डॉ पारिख म्हणाले.

हेही वाचा: तुम्हालाही झालाय का 'अँकिलोझिंग स्पॉन्डीलायटिस' नावाचा आजार?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ शशांक जोशी म्हणतात, “सुरुवातीच्या दिवसांपासूनच कोरोनाने जागतिक स्तरावर महिलांपेक्षा पुरुषांना अधिक प्रभावित केले आहे.पुरुषांच्या पेशींमध्ये ACE2 चे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्यावर जास्त परिणाम झाला आहे.”

Web Title: Corona Virus Alters Proteins In The Sperm Cells Thereby Affecting Fertility

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top