Mental Health: लग्नानंतरच्या प्रश्नांवर मार्ग शोधताना

Relationship advice and mental health support : उशिरा झालेली लग्ने, करिअर आणि मातृत्वाचा ताण तसेच वैवाहिक आयुष्यातील शारीरिक व मानसिक समस्यांमुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर समुपदेशक डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांनी सकारात्मक विचार आणि योग्य नियोजनाचा मोलाचा सल्ला दिला आहे.
Relationship advice and mental health support

Relationship advice and mental health support

esakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी समुपदेशक

प्रश्‍न : माझे वय ३७ वर्षे आहे. माझे लग्न ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाले. लग्न उशिरा झाल्यामुळे आता मला पुढील आयुष्याबद्दल थोडी चिंता वाटत आहे. मी नोकरी करते आणि नोकरीसह कुटुंब सांभाळणे तसेच मूल होण्याचा विचार या दोन्ही गोष्टींचा ताण येतो. माझे सध्याचे वजन ७१ किलो आहे. डॉक्टरांनी मला तीन महिने वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. माझ्या पतीचे वय ४२ वर्षे आहे. त्यामुळे आम्ही मूल होण्याचा विचार आताच करावा का, की थोडा वेळ थांबावे, याबद्दल संभ्रम आहे. या सगळ्या विचारांमुळे माझे ‘ओव्हरथिंकिंग’ होत आहे. अशा परिस्थितीत मी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.

उत्तर : तुमच्या मनात येणारी चिंता आणि संभ्रम अगदी स्वाभाविक आहेत. उशिरा लग्न झाल्यावर अनेक महिलांना करिअर, आरोग्य आणि मातृत्व या तीन गोष्टींचा समतोल कसा साधायचा याचा विचार सतत मनात येत असतो. सध्या डॉक्टरांनी तुम्हाला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक दिनचर्या यांमुळे तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल. निरोगी शरीर हे मातृत्वासाठीही उपयुक्त ठरते.

मुलाबाबतचा निर्णय घेताना तुम्ही आणि तुमचे पती दोघांनीही शांतपणे चर्चा करणे गरजेचे आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा ‘फर्टिलिटी स्पेशालिस्ट’ यांच्याकडून वैद्यकीय सल्ला घेतल्यास योग्य दिशा मिळू शकते. सध्या अनेक नवीन संशोधनांमुळे योग्य उपचार मिळू शकतात, त्यामुळे मनात भीती बाळगू नका. आयुष्याबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने निर्णय घेणे अधिक उपयोगी ठरते. सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन केल्यास नक्कीच योग्य मार्ग सापडू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com