- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ
मागच्या लेखात आपण ‘स्वामी विवेकानंद योग संस्थे’बद्दल माहिती घेतली. बंगळूरमधील हे विद्यापीठ पूर्णपणे योगाला वाहिलेलं आहे. इथेच ‘सायक्लिक मेडिटेशन’ (आवर्तन/आवर्ती ध्यान) या चल (डायनॅमिक) ध्यानाची रचना केली गेली. या ध्यानाला मांडूक्यकारिका या प्राचीन ‘भाष्य’ग्रंथातल्या श्लोकांचा संदर्भ आहे.
लये संबोधयेत् चित्तं
विक्षिप्तं शमयेत् पुनः।
सकशायं विजानीयात्
समप्राप्तं न चालयेत् ॥
हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. पतंजलींनी सांगितलेल्या मनाच्या पाच अवस्थांपैकी ‘विक्षिप्त’ ही अवस्था आहे.