

Skin care Tips: अनेक लोकांना जखम झाल्यास त्वचेवर काळे निळे डाग पडतात. हे सामान्य आहे. पण अनेकांना दुखापत न होताही त्वचेवर काळे निळे डाग पडतात. काही वेळा आपल्याला कोणत्याही कारणाशिवाय शरीरावर निळे डाग दिसू शकतात. ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. हे निळे डाग सामान्यतः दुखापत, ताणणे किंवा दाबामुळे होतात, परंतु काहीवेळा ते कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय येऊ शकतात. तर हे निळे डाग सामान्य आहेत का आणि ते कसे टाळता येतील हे जाणून घेऊया.