माझी मुलगी दीड वर्षाची आहे. तिचे खाणे-पिणे व्यवस्थित आहे, किरकिर वगैरे करत नाही. शांत झोपते, पण मध्यंतरी तपासणी केल्यावर तिचे हिमोग्लोबिन कमी आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी काय उपचार करावे हे कृपया सांगावे.
- वीणा नाखवा, नवी मुंबई
उत्तर – वाढत्या वयाच्या मुलांमध्ये बऱ्याच वेळा हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचे दिसते. यासाठी आहाराचे व्यवस्थित नियोजन करणे महत्त्वाचे असते. आठवड्यातून किमान ३-४ वेळा पालकाचे सूप इतर भाज्यांबरोबर मिश्रण करून द्यावे. तसेच सफरचंद डाळिंबासारखी फळे तिच्या रोजच्या आहारात नक्की ठेवावीत. जमत असल्यास रोज रात्री ७-८ काळ्या मनुका पाण्यात भिजवाव्या. दुसऱ्या दिवशी कुस्करून तिला पाणी प्यायला द्यावे, मनुका खायला द्याव्या. ती अशा प्रकारे मनुका खायला तयार नसल्यास मनुका बारीक करून तिच्या आमटीत किंवा सूपमध्ये घालता येतील. अंजीर दुधात वा पाण्यात भिजवून तिला खायला द्यावे. रोज सुवर्ण व केशरयुक्त संतुलन बालामृत तिला नक्की द्यावे. तसेच न्याहारीमध्ये अमृशर्करायुक्त पंचामृत देण्याचा फायदा होऊ शकेल. ती व्यवस्थित जेवते हे उत्तम आहेच, पण पचन व्यवस्थित होण्यासाठी संतुलन बाल हर्बल सिरप व सॅन अग्नी सिरप द्यावे. दिवसातून एकदा संतुलन बाळगुटी देण्याचाही फायदा होऊ शकेल.