- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं, की ‘फॅट म्हणजे चरबी वाढवणारा पदार्थ’. लोणी-तूप खाल्लं की वजन वाढतं आणि अंडी, मटण, मासे खाल्ल्यावर कोलेस्टेरॉल वाढतं असा आपला समज आहे. त्यामुळे अनेक जण आजही ‘लो-फॅट डाएट’, ‘फॅट फ्री दूध’, आणि ‘तेल न घालता भाजी’ अशा गोष्टींना प्राधान्य देतात. जे खरंतर चुकीचं आहे. कारण, सर्व ‘फॅट्स’ हे वाईट नसतात, आणि सर्व ‘फॅट्स’मुळे वजन वाढत नाही.