Health News: डेंग्यू पेशंटच्या डाएटमध्ये 'या' गोष्टींचा करा समावेश, होईल फास्ट रिकव्हरी

डेंग्यू आजारातून फास्ट रिकव्हरी हवी असेल तप फॉलो करा हे डाएट प्लान
Health News: Dengue Fever Fast recovery by easy tips
Health News: Dengue Fever Fast recovery by easy tipsesakal

डॉक्टर्सचा सल्ला बघता एका निरोगी व्यक्तीच्या शरीरात साधारत: दीड लाख ते चार लाख प्लेटलेट्स असतात. मात्र डेंग्यू आजार झाल्यानंतर या प्लेटलेट्समध्ये घट होऊन त्या पन्नास हजारांवर जातात. असे झाल्यास तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. तो टाळण्यासाठी हेल्थ एक्सपर्ट्स काही घरघुती उपाय सुचवत असतात. हे उपाय धोका टाळण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतात. (Health News: Dengue Fever Fast recovery by easy tips)

डेंग्यूचा ताप एडीज या डासामुळे वाढतो. या आजारात डेंग्यूमुळे पेशंटच्या शरीरातील प्लेटलेट्समध्ये वेगाने घट होत असते. या आजारात पेंशटची योग्य काळजी घेतली गेली नाही तर जीवाला धोका असतो. अशावेळी एक्सपर्ट्सने सुचवलेले काही उपाय महत्वाचे ठरतात.

शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका

पेशंटच्या शरीरात पाण्याची कमतरता होता कामा नये हे डेंग्यूच्या तापामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं ठरतं. त्यामुळे ज्यालाही डेंग्यूचा ताप आला असेल त्यांना फळांचा रस, सूप, फ्रेश नारळ पाणी तसेच अनार आणि अननसचा ज्यूस दिला जातो.

Health News: Dengue Fever Fast recovery by easy tips
Health Tips: 'या' घरगुती उपायांनी ताप घालवा

या आजारात अशक्तपणा दूर करण्यासाठी रीहायड्रेशन सगळ्यात महत्वाचं ठरतं. जास्तीत जास्त पालेभाज्या खाव्या. तसेच डाएटमध्ये पौष्टिक आहार घ्यावा. तसेच डेंग्यू तापामध्ये ताप वाढतो आणि कमी होतो. त्यावेळी विशेष लक्ष ठेवण्याची गरज असते.

बकरीचं दूध

डेंग्यूच्या तापात प्लेटलेट्सचा काऊंट वाढवण्यासाठी बकरीचं दूध महत्वाचं ठरतं. त्यामुळे या तापात गाय किंवा म्हशीचं दूध देण्याऐवजी बकरीचं दूध फायदेकारी ठरेल. बकरीचं दूध निश्चितपणे प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करत असल्याचा दावा एक्सपर्ट्स करतात.

डेंग्यूचा प्रसार तुमच्या आजूबाजूला असलेलं साचलेलं पाणी आणि घाण या कारणाने होतो. त्यामुळे तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं महत्वाचं ठरतं. रात्री झोपताना फूल स्लीव्ज कपडे आणि मॉस्किटो किलरचा वापर केल्यास डेंग्यूचा धोका टळू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com