क्षमतांचा विकास

स्प र्धात्मक जगात टिकाव धरायचा असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर outer journey आणि Inner journey या दोन्ही दिशांच्या प्रवासासाठी प्रयत्न करावे लागतील.
क्षमतांचा विकास
क्षमतांचा विकासsakal
Updated on

मनाचिये द्वारी

डॉ. विद्याधर बापट,मानसतज्ज्ञ

स्प र्धात्मक जगात टिकाव धरायचा असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर outer journey आणि Inner journey या दोन्ही दिशांच्या प्रवासासाठी प्रयत्न करावे लागतील.

Outer Journey : आता outer journey म्हणजेच व्यक्तिमत्त्वाचा भौतिक यशाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी पुढील गुण रुजायला हवेत.

आत्मविश्वास, संभाषण कौशल्ये, निर्णयक्षमता, धैर्य, सकारात्मक विचारसरणी, दूरदृष्टी, संतुलित विचारसरणी आणि कुठल्याही परिस्थितीत शांत रहाण्याची क्षमता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व-प्रयत्नाने मिळवता येतात व वृद्धिंगत करता येतात. प्रत्येक व्यक्तीची मानसिक जडणघडण वेगवेगळी असते. तिला अनुसरून वेगवेगळ्या थेरपीज तज्ज्ञ design करतात. क्षमतांच्या विकासासाठी माझ्यात पुढील गुण रुजवायला हवेत.

समानुभूती : समोरच्याला समजून घेण्याची आणि त्याच्याशी भावना शेअर करण्याची क्षमता.

कल्पकता आणि निर्मितीक्षमता : कल्पनाशक्ती आणि माझ्या सर्व क्षमता पूर्ण वापरून मी निर्मितीक्षम असलो/ असले पाहिजे.

उत्कटता आणि तळमळ : माझं ध्येय गाठण्यासाठी तीव्र उत्कटता व तळमळ हवी.

आयुष्यभरासाठी विद्यार्थी असणं : माझी नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद कायम असायला हवी.

चांगला श्रोता : समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता माझ्यात विकसित व्हायला हवी.

आपलं म्हणणं समजावून देण्याची क्षमता : तार्कीकदृष्ट्या आपलं म्हणणं समोरच्याला पटवून त्याच्याकडून कृती करवून घेण्याची क्षमता हवी.

जबाबदारी : आपल्या निर्णयांची, कृतींची जबाबदारी घेण्याची क्षमता असायला हवी.

नेतृत्व : कुठल्याही मानसिकतेच्या समूहाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात हवी.

प्रामाणिकपणा आणि मूल्य : आपल्या भूमिकेशी किंवा ठरवलेल्या मार्गाशी आणि मूल्यांशी प्रामाणिक रहायचा कणखरपणा असायला हवा.

सर्वश्रुतता, सतर्कता : आजूबाजूच्या जगात काय चाललंय, इतर स्पर्धकच नव्हे तर जागतिक सामाजिक घडामोडींविषयी मी सतर्क असायला हवं.

अद्ययावत टेक्नोलॉजी : technology अद्ययावत होत जात आहे. मला ती आत्मसात करायलाच हवी.

स्वयंमूल्यमापन : मी सतत स्वत:कडे, माझ्या प्रगतीकडे त्रयस्थपणे पाहून मूल्यमापन करायला हवं.

Inner Journey (आंतरिक स्वास्थ्य) : बाहेर यशस्वी होत असतानाच आंतरिक स्वास्थ्याकडे, मन:शांतीकडे होणारा प्रवास तितकाच महत्त्वाचा आहे. बाहेरच्या यशापयशाचा माझ्या मन:शांतीवर काहीही परिणाम होणार नाही. अनेक वाईट मोहांचा, चंगळवादाचा, असूयेचा माझ्यावर परिणाम होणार नाही आणि माझ्या मनाचा आतला गाभा नेहमी शांत, स्वस्थ, कणखर आणि आनंदी राहणं यासाठीचे प्रयत्न ह्यात असतील. एकूणच माझ्या व जगाच्या अस्तित्वाविषयीची जाण, मानवी प्रयत्नांची मर्यादा आणि हातात नसलेल्या गोष्टींचा स्वीकार, आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करण्याचा दृष्टिकोन या गोष्टी ह्यात अंतर्भूत होतात. नियमित केलेल्या ध्यानामध्ये मनाच्या डोहात खोलवर जाऊन शांत होत जाणं यात अपेक्षित असतं.

हे सगळं जमण्यासाठी मनाचे सर्व स्तर शांत असायला हवेत. आता हा वरील सगळा प्रवास शक्य आहे, जर आपण ताणतणावाचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकलो तरच. त्यासाठी मनाची मशागत करावी लागेल. त्यात काही बीजं पेरावी लागतील. मनाची मशागत करताना काही भावना, विचारांना आपला भागच बनवावं लागेल. पहिली भावना आहे कृतज्ञतेची. प्रत्येक क्षणी मला जे जे काही कुणा व्यक्तीकडून, निसर्गाकडून, एकूणच या अस्तित्वाकडून मिळतंय त्याबद्दल मला विनम्रपणे कृतज्ञता वाटायला हवी. त्यानं माझ्यात सकारात्मकतेची बीजं पेरली जातील. आता पुढची पायरी आहे मनात दडलेले प्रत्यक्षपणे जाणवणारे, आणि लपलेले ताण ओळखणं आणि नाहीसे करणं.

तणावाचं व्यवस्थापन करणं : बऱ्याचदा ताण का येतो याची खरी कारणं आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कळत नकळत आपण खऱ्या कारणांकडे दुर्लक्षही करतो. उदा. आपण म्हणतो, मला डेडलाईन्स पाळण्याचं सतत टेन्शन असतं. त्यामुळे ताण येतो. डेडलाईन्स पाळायच्या असतात ही गोष्ट खरी; पण ताण आपल्याला त्यामुळे नसतो, तर आपल्या स्वभावातील काही दोषांमुळे असतो. उदा., कामं पुढे ढकलण्याची सवय, कामातील शिस्तीचा अभाव, स्वत:च्या कामावर शंभर टक्के लक्ष केंद्रित न करू शकणे वगैरे. उपाय या खऱ्या कारणांवर करायला हवा, तरच मुळासकट ताण नाहीसा होऊ शकेल. स्पर्धेच्या युगात डेडलाइन्स असणारच. उलट कामाचं वेळेचं सुयोग्य व्यवस्थापन करून, आपण त्या डेडलाइन्स पूर्ण करण्याच्या प्रोसेसचा आनद घ्यायला हवा. हा खेळाचा भागच आहे. (क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.