

Rising Developmental Delay Among Children Raises Health Concerns; Free Screening Announced
sakal
बालकांमध्ये इतर आरोग्य समस्यांपेक्षा 'विकासात्मक विलंब' समस्या असलेल्या रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा रुग्णालयातील डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर (डीईआयसी) या उपचार केंद्रामार्फत गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत शून्य ते १८ वर्षे वयोगटातील जन्मजात दोष, पोषण कमतरता, विविध आजार व विकासात्मक विलंब अशा चार प्रकारच्या समस्या असलेल्या ४ हजार २३१ बालकांची नोंद झाली. त्यापैकी, ६० टक्के बालकांमध्ये (२,६७३) विकासात्मक विलंब (डेव्हलपमेंटल डिले) ही समस्या आढळून आली आहे.