Diabetes Control : ही पानं तुमच्या शरीरात इंसुलिनचं काम करेल, शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील

अंदाजानुसार, 2045 पर्यंत भारतात 13 कोटींहून अधिक लोक मधुमेहाचे रुग्ण असतील. त्यामुळे भारताला कॅपिटल ऑफ डायबिटीज म्हटले जाते
Aloe Vera for Diabetes Control
Aloe Vera for Diabetes Controlesakal

Diabetes Control Tips : आजच्या काळात तुम्हाला प्रत्येक घरात मधुमेहाचा रुग्ण नक्कीच सापडेल. बऱ्याचदा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि जीवनशैलीमुळे लोक मचे मधुमेहाचे रूग्ण होत आहेत. मधुमेह ही एक अतिशय गुंतागुंतीची स्थिती आहे. त्यामुळे हार्ट, बीपी, किडनी, डोळा यांसंबंधीचे आजारही होतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगातील सुमारे 42.2 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यासोबतच मधुमेहामुळे दरवर्षी 15 लाख लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मृत्यू होत आहे.

सध्या सुमारे आठ कोटी लोकांना मधुमेह आहे. अंदाजानुसार, 2045 पर्यंत भारतात 13 कोटींहून अधिक लोक मधुमेहाचे रुग्ण असतील. त्यामुळे भारताला कॅपिटल ऑफ डायबिटीज म्हटले जाते.

छोटे छोटे घरगुती उपाय करूनही आपण मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतो. जर आपण आपली जीवनशैली व्यवस्थित केली तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकतो.

एनसीबीआय (अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की काही औषधी पाने चघळल्यास इंसुलिनचे उत्पादन वाढवून रक्तातील साखर नियंत्रित केली जाऊ शकते.

Aloe Vera for Diabetes Control
Symptoms Of Diabetes: मधुमेहामुळे बिघडते स्त्रियांचे लैंगिक आरोग्य; जाणून घ्या परिणाम आणि उपाय

या पानांचा फायदा होईल

कोरफडीची पाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करतात. कोरफड ही भारतातील एक विशेष औषधी वनस्पती मानली जाते. एनसीबीआयने केलेल्या संशोधनात असेही म्हटले आहे की कोरफडीमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म आहेत.

यामध्ये तुमच्या रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता आहे. कोरफडीची पाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने इन्सुलिन तयार होऊ शकते.

Aloe Vera for Diabetes
Aloe Vera for Diabetes

त्याचप्रमाणे सिताफळीच्या पानांचाही तुम्हाला खूप फायदा होईल. सिताफळ अतिशय गोड आणि चविष्ट असते. त्याची पानेही खूप चांगली असतात. त्याच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात आणि त्यात फोटोकॉन्स्टिट्यूड गुणधर्म असतात, ज्यामुळे स्वादुपिंडात इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हे रोज खाल्ल्याने तुमची रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात राहते.

Aloe Vera for Diabetes Control
Diabetes च्या रूग्णांसाठी अमृतासारखे आहेत हे आयुर्वेदीक पदार्थ, ब्लड शुगर कायम ठेवेल नियंत्रणात

कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटीबेक्टेरियल गुणधर्म आढळतात. याशिवाय NCBI च्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की कडुलिंबाची पाने मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकतात. सकाळी लवकर कडुलिंबाची पाने चघळल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही आणि स्वादुपिंड आपले काम योग्य प्रकारे करतो, त्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेद्वारे इन्सुलिन तयार होते. कडुनिंबाच्या पानांमध्ये असे अनेक संयुगे आढळतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com