Diabetes : नारळ पाणी पिल्याने मधुमेहाच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगल लेव्हल वाढते का? जाणून घ्या सविस्तर

मधुमेहात नारळ पाणी प्यावे की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.
Diabetes
Diabetesesakal

Diabetes : मधुमेह हा असा आजार आहे जो एकदा झाल्यानंतर त्यातून सुटका नाही, मात्र योग्य काळजी घेत तुम्ही पुढील धोके टाळू शकता. मात्र काही गोष्टी खाण्याबाबत लोकांच्या मनात संभ्रम असतो. से की नारळ पाणी. मधुमेहात नारळ पाणी प्यावे की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

नारळाचे पाणी पिणे नेहमीच आरोग्यासाठी चांगले मानले गेले आहे, कारण ते एक नैसर्गिक पेय आहे. नारळ पाणी बरेच लोक मोठ्या आवडीने पितात. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि आपल्याला झटपट ऊर्जा पुरवण्यात मदत करते, परंतु मधुमेही नारळ पाणी पिऊ शकतात का?

नारळाच्या पाण्यात नॅचरल शुगर असल्याने आणि ते हलके गोड असल्याने ते पिण्याबाबत मधुमेही रुग्ण नेहमीच घाबरतात. तेव्हा ते पिणे योग्य की अयोग्य ते आपण प्रसिद्ध डायटीशियन आयुषी यादव यांच्याकडून जाणून घेऊया.

Diabetes
Diabetes च्या रूग्णांसाठी 10 बेस्ट ड्रिंक ऑप्शन्स, रोज प्या अन् कायम ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवा

नारळ पाण्यात असणारे न्यूट्रिएंट्स

डायटीशियन आयुषी यांच्या मते, दुधापेक्षा नारळाच्या पाण्यात जास्त पोषक तत्वे आढळतात. यामध्ये फॅटचे प्रमाण फारच कमी असते, तसेच जे त्याचे नियमित सेवन करतात त्यांच्या शरीराला पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर टाकले जातात, त्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो.

Diabetes
Parachute Coconut Oil Success Story : पॅराशूट खोबरेल तेलाचा सर्वात मोठा ब्रँड बनाण्यामागची गोष्ट

मधुमेहाचे रूग्ण नारळ पाणी पिऊ शकतात का?

आहारतज्ञ आयुषी यांनी सांगितले की मधुमेहाचे रुग्ण नारळाचे पाणी पिऊ शकतात, त्यांनी हे नैसर्गिक पेय रोज प्यावे कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी आहे.

नारळाच्या पाण्यात असलेले मॅग्नेशियम इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि त्याचबरोबर त्यांना इस्टंट एनर्जीही मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com