Diabetes : मधुमेहाने त्रस्त आहात; दुधात मिसळून प्या 'या' 3 गोष्टी; शुगर लेव्हल राहील नियंत्रणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

diabetes

मधुमेहाने त्रस्त आहात; दुधात मिसळून प्या 'या' 3 गोष्टी; शुगर लेव्हल राहील नियंत्रणात

मधुमेहामुळे जगभरातील अनेक लोकांचा झपाट्याने बळी जात आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. मधुमेहाचा थेट परिणाम शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर होतो. मधुमेहामध्ये अनेक पदार्थ किंवा काही पेयांचे सेवन केले जाऊ नये असे सांगितले जाते. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराबाबत नेहमीच काळजी घ्यावी लागते.

मधुमेहावर कोणताही इलाज नाही. केवळ आहार आणि जीवनशैलीत बदल करून तो नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहींनी विशेषतः गोड आणि पिठाच्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे. दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दुधात या तीन गोष्टींचे सेवन मधुमेहींसाठी खूप चांगले मानले जाते. ते महत्वाचे घटक कोणते हे सांगत आहोत..

हळद दूध

हळदीचे दूध पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्हाला माहित आहे का, हळदीचे दुध पिल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. हळदीमध्ये असे अनेक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हळद अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानली जाते. हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.

दालचिनी दूध

दालचिनी हा असाच एक मसाला आहे. जो कोणत्याही पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरला जातो. दालचिनीमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, बीटा कॅरोटीन, अल्फा कॅरोटीन, लाइकोपीन, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. दालचिनीचे दूध प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

बदामाचे दूध

बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बदामामध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर, प्रोटीनचे गुणधर्म आढळतात. हे घटक शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. बदामाचे दूध प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतो.