

- डॉ. अजय कोठारी | डॉ. सिंपल कोठारी
आपण गेल्या भागात ऑस्टियोपोरोसिसची माहिती घेतली. त्याचे निदान कसे होते आणि चाचण्यांबाबत माहिती घेणार आहोत.
हाडांची घनता चाचणी म्हणजे बोन मिनरल डेनझिटी (BMD) यामध्ये डेक्सा स्कॅन केले जाते. किंवा त्यास डीएक्सए असेही संबोधले जाते. याद्वारे आपण हाडांची घनता मोजतो व त्याला एका ‘T’ स्कोअर द्वारे दर्शविला जातो. साधारण तीन अवयवामंध्ये ऑस्टिओपोरोसिसची तपासणी केली जाते.
मणका
मनगट
नितंब
या अवयवांमध्ये हाड तुटण्याची शक्यता अधिक असल्याने यांची निवड केली जाते. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या व्यक्तीस कोणतेही हाड तुटण्याची अधिक शक्यता असते. या चाचणीत कमी पातळीच्या क्ष-किरणांचा वापर केला जातो. या चाचणीला साधारणतः १५ ते २० मिनिटे लागतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही चाचणी केली जाते.
अन्य चाचण्या ऑस्टिओपोरोसिसचे कारण शोधण्यासाठी केल्या जातात.
व्हिटॅमिन-डी
कॅल्शिअम व दुसरे मिनरल्स
थायरॉईड
हिमोग्लोबीन
हाडांचे विकारांचे निदान करणारे घटक
ग्रंथीचे विकार निदान करणारे घटक
हाडांचा कर्करोग
उपचार
१) व्यायाम नियमित व्यायामामुळे तुमची हाडे मजबूत होऊ शकतात.
१) स्नायू बळकट करण्यासाठी वजन उचलणे.
२) गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध तुमचे शरीर कार्य करणारे व्यायाम तुमच्या हाडांवर जास्त ताण देतो तुमची ताकद वाढण्यास मदत करते. उदा. चालणे, योगासने, पिलाटेस.
२) व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्स
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन-डी व कॅल्शिअमचे सेवन करावे. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ते किती वेळा व किती काळ घ्यायला पाहिजे ते जाणून घेतले पाहिजे. कारण कधी कधी चुकीच्या डोसमुळे व प्रदीर्घ सेवनामुळे तुम्हाला दुष्परिणाम होऊ शकतात.
३) हार्मोनल औषधे
उच्च धोका असलेल्या व्यक्तीस पाराथाइरॉईडचे इंजेक्शनची आवश्यकता असू शकते.
ऑस्टिओपोरोसिसचा धोका व त्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
१) सर्व क्रिया करण्यापूर्वी संरक्षणात्मक उपकरणे घाला.
२) तुमच्या घरी आवश्यक बदल करून घ्या जेणे करून तुम्हाला इजा होणार नाही.
उदा ः रेलिंग बसवून घेणे
- बाथरूममध्ये घसरणाऱ्या फरशा काढून घेणे.
- सामान काढताना स्टूल ऐवजी चांगल्या शिडीचा वापर करावा जेणेकरून पडण्याचा धोका कमी होईल.
३) पौष्टिक आहार व व्यायाम नित्य नियमाने करावे.
४) प्रौढ व वयस्कर माणसांनी घरात वावरताना वॉकरचा वापर करावा. त्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो.
५) नियमित आपल्या हाडांची घनता तपासून घेणे.
ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओपेनिया हे निदान झाल्यानंतर रुग्णांना पडणारे प्रश्न ः
१) डेक्सा स्कॅन परत कधी करावे?
- साधारण औषधांचा कोर्स संपल्यानंतर एका वर्षाने.
२) मला कोणती औषधे उपयोगी ठरतील?
ऑस्टिओपेनिया झालेल्या व्यक्तीस साधारणतः व्हिटॅमिन व कॅल्शिअमची औषधे दिली जातात. डॉक्टर विविध तपासण्या करून औषधाचा कोर्स ठरवतील.
अनेक लोकांना हाड तुटल्यानंतरच ऑस्टिओपोरोसिस आजार आपणास असल्याचे लक्षात आहे. हा आजार रोखण्यासाठी किंवा कोणती दुखापत टाळण्यासाठी नियमित तपासणीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.