Dialysis : ‘डायलेसिस’च्या रुग्णांसाठी ‘किडनी गार्ड’ ठरणार वरदान; पेटंट आणि डीएसटीचे मिळाले अनुदान

किडनी फेल झाल्यानंतर रुग्णावर ‘डायलेसिस’चा उपचार करण्यात येतो. तो करताना अनेकदा डायलेसिस अयशस्वी होण्याची शक्यता असते. मात्र, अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ती उपचार पद्धती अयशस्वी होऊ नये यासाठी ‘किडनी गार्ड’ तयार केले आहे.
dialysis patients kidney guard received grants of dst and patents health
dialysis patients kidney guard received grants of dst and patents healthSakal

नागपूर : किडनी फेल झाल्यानंतर रुग्णावर ‘डायलेसिस’चा उपचार करण्यात येतो. तो करताना अनेकदा डायलेसिस अयशस्वी होण्याची शक्यता असते. मात्र, अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ती उपचार पद्धती अयशस्वी होऊ नये यासाठी ‘किडनी गार्ड’ तयार केले आहे. त्यामुळे आता डायलेसिस करताना ही उपचार पद्धती प्रभावी ठरणार आहे.

विविध कारणांनी किडनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर डायलेसिस हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, अनेकदा ही उपचार पद्धतीही अयशस्वी होते. अशावेळी रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता अधिक असते.

हा धोका टाळण्यासाठी नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाचे साहाय्यक प्राध्यापक अभिजित राऊत यांनी ‘किडनी गार्ड’ची संकल्पना मांडली. आपल्या आचार्य पदवीसाठी विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे आणि प्रा. डॉ. रश्‍मी उद्दनवाडीकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संशोधन सुरू केले. बायोमेडिकल प्रकल्प असल्याने त्यासाठी त्यांना किडनीरोग तज्ज्ञ डॉ. धनंजय उखळकर आणि प्लास्टिक सर्जन डॉ. पवन शहाणे यांची मदत घेतली. त्यांच्या मदतीने किडनी गार्ड तयार केले.

डायलेसिस करताना हातातील रक्तवाहिनीचा फ्लो वाढविण्यासाठी आणि तो कायम टिकवून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येणे शक्य आहे. त्यामुळे डायलेसिस यशस्वी होण्यासाठी ते सहायक सिद्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून (डीएसटी) प्रा. अभिजित राऊत यांना अनुदान मिळाले असून त्यातून ते कार्य करीत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या प्रकल्पासाठी पेटंटही त्यांनी मिळविले आहे.

असा पडेल प्रभाव

किडनी गार्ड’ चे यश हे आरोग्यसेवेतील ‘इनोवेटिव्ह इम्प्लांट्स’ आणि नवनवीन संशोधनाबद्दलची संकल्पना आहे. या क्रांतिकारी इम्प्लांटमध्ये हिमोडायलिसिसच्या रुग्णांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची क्षमता असून ज्यामुळे त्या संबंधित गुंतागुंतीचे उपचार सुलभतेने होण्यास मदत होईल.

‘ॲनिमल ट्रायल्स’सुरू

‘किडनी गार्ड’हे अतिशय महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून त्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयात डॉ. शिरीष उपाध्याय, डॉ. आखरे, डॉ. गौरी फिसके आणि डॉ. भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ॲनिमल ट्रायल्स’सुरू करण्यात आलेली आहे.

आचार्य पदवी मिळविताना काही तरी नवे करण्याची इच्छा मनात होती. त्यातून किडनी रुग्णांची समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आणि ‘किडनी गार्ड’तयार केले. यामुळे किडनीच्या रुग्णांना खरोखरच फायदा होणार. त्यासाठी प्राचार्य डॉ. अमोल देशमुख यांची मदतही मोलाची ठरली.

- प्रा. अभिजित राऊत, प्राध्यापक, नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com