
Digital Intermittent Fasting: उपवासाची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. उपास म्हणजे, फक्त उपाशी राहणे नाही तर तो आत्मनियंत्रणाचा एक मार्ग आहे. ज्याप्रमाणे, शरीराला आरामाची गरज असते. त्याप्रमाणे, आजच्या डिजिटल युगात डोळे आणि मेंदूलासुद्धा विश्रांतीची गरज आहे. इंटरमीटंट फास्टिंग म्हणजे, शरीरासाठी केल्या जाणाऱ्या उपवासासारखाच पण हा उपवास मोबाइल, इंटरनेट आणि डिजिटल साधनांपासून केलेला उपवास होय.