
How Firecrackers Affect Lungs and Health: Precautions You Must Take
sakal
दिवाळीचा आनंद लुटताना फटाक्यांच्या धुरामुळे दमा, अस्थमा आणि फायब्रोसिस झालेल्या रुग्णांच्या श्वसनाच्या आजारात भर पडू शकते. त्यामुळे दिवाळी साजरी करताना इतरांच्या आरोग्याचाही विचार करा आणि धुराचे फटाके उडवणे टाळा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दिवाळीचा काळ तसा आरोग्यदायी असला तरी फटाक्यांतून निघणारा घातक धूर फुप्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक ठरतो.