Diwali: फटाके फोडताहेत? 'ही' काळजी आवर्जून घ्या | Precautions While Burning Firecrackers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali

Diwali: फटाके फोडताहेत? 'ही' काळजी आवर्जून घ्या

सध्या देशभरात दिवाळी उत्साहाने साजरी केली जात आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. दिवाळीचा आनंद घेण्यासाठी आपण फटाके फोडून जल्लोष करत असतो. फटाके हे प्रदुषण निर्माण करतात सोबतच फटाक्यांमुळे अनेक अपघात घडतात त्यामुळे फटाके न फोडलेलेचबरे.

काही हौशी लोक असतात ज्यांना फटाके फोडणे खूप आवडतं. पण फटाके फोडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सोबतच फटाक्याने आपण चुकून भाजलो तर योग्य वेळेत योग्य उपाय करणे गरजेचे आहे. ( precautions while burning firecrackers)

फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी?

 • फटाके फोडताना सर्वात जास्त इजो बोटाला किंवा हाताला होते. त्यामुळे फटाके फोडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

 • फटाके फोडताना डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. डोळे हे खूप नाजूक असतात. , डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक चष्मा घाला.

 • डोळ्यास इजा झाली तर त्वरीत नेत्रतज्ञांकडे जा.

 • डोळ्याला इजा करू नका. डोळे खाजत असल्यास पाण्याने घासू नका किंवा धुवू नका.

 • पालकांच्या देखरेखीखाली फक्त हिरवे फटाके फोडा.

 • फटाके पेटवताना आग लागली तर वाळूने ती विझवा.

 • हातात फटाके घेऊन फोडू नका. आणि फटाके फोडताना चेहरा दूर ठेवा.

 • फटाके वाजवताना जाड सुती कपडे घाला.

फटाक्याने भाजल्यास करा 'हे' घरगुती उपाय

 • फटाक्याने भाजल्यास परिस्थितीचं गांभीर्य समजून घरगुती उपचार करा नाहीतर त्वरीत डॉक्टरकडे जा.

 • जळजळ कमी करण्यासाठी जळालेलेल्या भागावर बर्फ लावा किंवा बर्फाचे पाणी टाका.

 • जळालेल्या जखमेवर कापूस लावू नका. जखम उघडी ठेवा.

 • जखमेवर मध लावल्यासही जखमेला आराम मिळतो.