Heart Attack Survivo: थांबलेले हृदयाचे ठोके झाले पुन्हा सुरू;डॉक्टरांच्या प्रयत्नामळे पन्नाशीतील रुग्णाचा वाचविला जीव
Nagpur Doctors: नागपुरात पन्नाशीतील एका रुग्णाला ‘टूम्बस्टोन अँटेरोलेटरल एसटी ईएमआय’सारखा घातक हार्ट अटॅक आला. डॉ. अमित बल्लमवार यांच्या टीमने वेळेत हस्तक्षेप करून ११ डीसी शॉकने रुग्णाचे प्राण वाचवले.
नागपूर : पन्नाशीतील रुग्ण, सकाळची वेळ छातीत दुखू लागले आणि गाव सोडले. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच शुद्ध हरपली. हृदयाच्या पंपिंगची क्षमता कमी झाली होती अन् ठोके थांबले, स्थिती इतकी गंभीर होती की मृत्यूचा धोका तब्बल ८० टक्के झाला होता.