
थोडक्यात:
अमेरिकेतील काही भागांमध्ये डिमेंशियाचे प्रमाण अधिक असून त्यामागे भौगोलिक स्थानाचे महत्त्वाचे कारण आहे.
डिमेंशिया ही एक स्थिती आहे ज्यात स्मरणशक्ती, विचार आणि रोजचं वागणं यावर परिणाम होतो, आणि याचे प्रमुख कारण अल्झायमर रोग आहे.
यावर ठोस इलाज नसला तरी मेंदू सक्रिय ठेवणे, निरोगी आहार, नियमित झोप आणि धूम्रपान टाळणे हे फायदेशीर ठरू शकते.
How Does your Location Affect Dementia Risk: एका नव्या संशोधनातून असं दिसून आलंय की अमेरिकेतील काही भागांमध्ये लोक विसरभोळेपणाने म्हणजेच डिमेंशियाने जास्त प्रमाणात त्रस्त आहेत. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीला आपलं नाव, आजूबाजूचे लोक, राहण्याचं ठिकाण आणि अगदी अलीकडच्या घडामोडीही लक्षात राहत नाहीत.
शास्त्रज्ञ असं सांगतात की, एखादा माणूस कुठे राहतो यावरसुद्धा या आजाराचा धोका किती आहे हे अवलंबून असतं. चला तर मग या आजाराबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
JAMA Neurology या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात असं स्पष्ट झालंय की, एखाद्या व्यक्तीचं राहण्याचं ठिकाण हे त्याला डिमेंशिया होण्याच्या शक्यतेवर परिणाम करतं.
हे संशोधन अमेरिकेतील Veterans Health Administration (VHA) मध्ये नोंद असलेल्या वृद्धांवर केलं गेलं होतं. यात वेगवेगळ्या राज्यांतील रुग्णांची तुलना करण्यात आली.
तपासणीदरम्यान असं आढळून आलं की:
मिड-अटलांटिक भागात डिमेंशियाचे रुग्ण सर्वात कमी होते.
तर दक्षिण-पूर्वेकडील भागात हे प्रमाण सर्वाधिक होतं.
या अभ्यासात खालील भागांमध्ये डिमेंशियाचे प्रमाण जास्त आढळून आलं:
दक्षिण-पूर्व: २५% अधिक
उत्तर-पश्चिम आणि रॉकी माउंटन: २३% अधिक
दक्षिण भाग: १८% अधिक
दक्षिण-पश्चिम (कॅलिफोर्नियासह): १३% अधिक
उत्तर-पूर्व (न्यूयॉर्कसह): ७% अधिक
डिमेंशिया हा एक आजार नसून, स्मरणशक्ती, विचारशक्ती, बोलणं, समज, निर्णयक्षमता यांवर परिणाम करणाऱ्या आजारांचा एक गट आहे. याचं मुख्य कारण म्हणजे अल्झायमर रोग. हा आजार वय वाढल्यावर जास्त प्रमाणात दिसतो, पण सगळ्यांनाच होतो असं नाही.
NIH च्या माहितीनुसार, अमेरिकेत दरवर्षी ६ दशलक्षाहून अधिक लोकांना डिमेंशिया होतो आणि यामुळे १,००,००० पेक्षा जास्त मृत्यू होतात. संशोधकांचा अंदाज आहे की, ५५ वर्षांवरील ४२% अमेरिकन लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे.
हा विकार मेंदूतल्या तंत्रिका पेशी (nerve cells) आणि त्यांच्या कनेक्शनला नुकसान झाल्यामुळे होतो. यामुळे व्यक्तीच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, आणि तो प्रत्येक व्यक्तीत वेगळा असतो.
अलीकडील गोष्टी विसरणं
वस्तू चुकीच्या जागी ठेवणं
चालताना किंवा गाडी चालवताना हरवणं
ओळखीच्या ठिकाणी गोंधळून जाणं
निर्णय घेण्यात अडचण
नेहमीची कामं करणं कठीण जाणं
यावर अजून तरी ठोस उपचार नाहीत, पण काही गोष्टी केल्याने लक्षणं टाळता किंवा कमी करता येतात:
मेंदूचे व्यायाम करा: पुस्तकं वाचा, कोडी सोडवा, शब्दांचे खेळ खेळा
सतत हलचाल ठेवा: शारीरिक व मानसिक सक्रियता महत्वाची
योग्य झोप घ्या: रोज ७ ते ९ तास झोप आवश्यक
धूम्रपान सोडा: धूम्रपान केल्याने धोका वाढतो
आरोग्यदायी आहार घ्या: मेडिटेरेनियन डाएट फायदेशीर आहे — यात फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असतो.
डिमेंशिया म्हणजे काय आणि तो व्यक्तीवर कसा परिणाम करतो? (What is dementia and how does it affect a person?)
डिमेंशिया ही स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि दैनंदिन कामांवर परिणाम करणारी मेंदूशी संबंधित स्थिती आहे.
अमेरिकेतील कोणत्या भागांमध्ये डिमेंशियाचे प्रमाण सर्वाधिक आहे?(Which regions in the U.S. have the highest rates of dementia?)
दक्षिण-पूर्व, उत्तर-पश्चिम आणि रॉकी माउंटन भागांमध्ये डिमेंशियाचे प्रमाण इतर भागांपेक्षा जास्त आढळले आहे.
डिमेंशियाची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात? (What are the early signs of dementia?)
अलीकडील गोष्टी विसरणं, वस्तू हरवणं, ओळखीच्या ठिकाणी गोंधळणं आणि निर्णय घेण्यात अडचण ही काही सुरुवातीची लक्षणं आहेत.
डिमेंशिया टाळता किंवा नियंत्रित करता येतो का? (Can dementia be prevented or managed?)
डिमेंशिया टाळण्यासाठी मेंदू सक्रिय ठेवणे, व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप या गोष्टी उपयुक्त ठरतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.