esakal | लोगो - जागर स्त्री आरोग्याचा - डॉ. शीतल धनवडे
sakal

बोलून बातमी शोधा

 डॉ. शीतल धनवडे

लोगो - जागर स्त्री आरोग्याचा - डॉ. शीतल धनवडे

sakal_logo
By
- प्रकाश निंबाळकर

बालपणातील कुपोषण, कुटुंबातील दुय्यम वागणूक आणि पुढे वाट्याला येणारी उपवास-व्रत वैकल्ये अशा अनेक कारणांमुळे भारतीय स्त्रियांमध्ये कुपोषणाची समस्या आहे. आज स्त्रिया मोठ्या संख्येने घराबाहेर पडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्या तरी स्वतःकडे पाहण्याची दृष्टिकोन दुय्यमच असतो. त्यातून कुपोषणाची समस्या सर्व आर्थिक स्तरात आढळते. स्त्रियांमधील कुपोषणाच्या समस्येविषयी सांगत आहेत आहारतज्ज्ञ व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी - डॉ. शीतल धनवडे

शरीराच्या वाढीसाठी आवश्‍यक पोषणमूल्ये नियमित आहारातून मिळत नसतील, तर कुपोषण होते आणि त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या लक्षणांमधून दिसू लागतात. यात स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या कुपोषणामागची कारणे वेगवेगळी आहेत आणि त्याबरोबरच ती सामाजिक व्यवस्थेतून आली आहेत. केवळ गरीबच नव्हे; तर श्रीमंत वर्गातील स्त्रियांमध्येही कुपोषण आढळते. भारतात गरिबी हे कुपोषणाचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. स्त्रियांच्या कुपोषणाचा समाजाला दुहेरी तोटा होत असतो. त्या उद्याच्या माता असतात.

हेही वाचा: Drug case: रिया, दिपीकानंतर आता पुढचं टार्गेट शाहरुख - मलिक

त्यांच्यातील कुपोषणामुळे भावी पिढीचे गर्भातच कुपोषण होते. अपुरा आणि कमी पोषणमूल्ये असलेल्या आहारामुळे मासिक पाळीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे रक्ताल्पता हे कुपोषणाचे मोठे कारण आहे. किशोरवयीन मुली, प्रजननक्षम स्त्रिया, गर्भवती माता, स्तनदा माता अशा सर्व वयोगटातील सार्वत्रिक समस्या रक्तक्षय ही आहे. हिमोग्लोबिनची कमतरता आढळते. त्याचे दुष्परिणाम दिसतात. त्यात थकवा, उदासीनता, कुमकुवतपणा, चिडचिडेपणा, विविध प्रकारचे जंतुसंसर्ग अशी दृश्‍य कारणे पुढे येतात. बऱ्याचदा मासिक पाळीच्या त्रासामुळेही कुपोषण होते. अतिरक्तस्राव होऊन रक्तक्षय होतो. स्थूलता, पोटाचे आजार, हार्मोन्स, असंतुलन, थायरॉईड समस्या उद्‌भवतात.

बालपणाच्या कुपोषणामुळे पुढे अनेक त्रास होतात; मात्र तरीही या समस्येवर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मात करण्याचा निर्धार महिलांनी करायला हवा. योग्य पोषणमूल्याचा आहार घेणार असा निर्धार करून स्त्रियांना या समस्येविरोधात लढावे लागणार आहे. स्वयंपाकगृहातील स्वच्छता प्राधान्यक्रमाने हवी. कमी वयातील विवाह, गरोदरपण टाळले पाहिजे. दोन मुलांमधील अंतर वाढवले पाहिजे. मासिक पाळी नियमित असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. अनियमिता असेल तर तत्काळ त्याची कारणे शोधली पाहिजेत. स्तनदा मातांनी पूरक आहारासोबत टॉनिक गोळ्या घेतल्या पाहिजेत.

हेही वाचा: Chipi Airport Live: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण

शासनानेही यासाठी निमियामुक्त भारत अभियान सुरू केले आहे. कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व महिलांना लोहयुक्त गोळ्या-सिरप मोफत दिले जाते.

हे कराच !

० अन्न शिजवताना पोषणमूल्ये टिकवून ठेवण्याची पद्धती शिकून घ्या

० कर्बोदके, प्रोटीन्स, फॅटस् , जीवनसत्त्वे, खनिजे अशा घटकांचा आहार घ्या

० भूक लागल्यावरच खा, सर्व जेवल्यावर शेवटी जेवण नको

० तूप, तेल, वरीचे तांदूळ, राजगिरा, जवस, सेंद्रिय गूळ यांचा अन्नात आवर्जून समावेश करा.

० आहारविज्ञान समजून घ्या, पीठ चाळून घेणे, कोंडा बाजूला काढणे, फळाच्या साली काढणे, पालेभाज्या अति शिजवणे अशा गोष्टी टाळा

loading image
go to top