Health: महत्वपूर्ण! पाठीचं दुखणं हलक्यात घेऊ नका, असू शकतात कँसरचे लक्षणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health

Health: महत्वपूर्ण! पाठीचं दुखणं हलक्यात घेऊ नका, असू शकतात कँसरचे लक्षणं

Back Pain: रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांचं त्यांच्या पाठ दुखी, सांधेदुखीकडे दुर्लक्ष होते. मात्र तुमचं दूर्लक्ष करणे तुमच्या आयुष्यात गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतं. काहींना पाठदुखीचा त्रास एका विशिष्ट वयानंतर सुरू होतो तर काहींना हा त्रास कमी वयातच सुरू होतो. पाठदुखीचं मुख्य कारण मासपेशींच्या उद्भवणाऱ्या समस्या आहेत.

साधारण पाठदुखी असेल तर त्याला स्ट्रेचिंग करून, आराम करून आणि ठंड्या किंवा गरम पाण्याने शेक देवून दूर करता येते. मात्र पाठदुखीची ही समस्या तुमच्यासाठी तेव्हा गंभीर ठरू शकते जेव्हा पाठदुखी कँसरसारख्या गंभीर आजारांचे लक्षण ठरते. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत पाठीचं दुखणं जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा.

हेही वाचा: Health : झोपेच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात ; करा हा घरगुती उपाय

तुमच्या माहितीसाठी कँसरचे असे काही प्रकार आहेत ज्यामध्ये पाठदुखी दिसून येते. त्यामुळे तुम्हाला अशी लक्षणे आढळल्यास तुम्ही वेळीच सावध व्हा.

ब्लॅडर कँसर

मूत्रपिंड हा पोटाच्या खालचा भाग असून पाठीच्या खालच्या भागात जर का तुम्हाला दुखत असेल तर हे मूत्रपिंडाच्या कँसरचंही लक्षण असू शकतो. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ अशी समस्या उद्भवत असेल तर लगेच डॉक्टरशी संपर्क साधा.

हेही वाचा: Mother Health: बाळंतपणानंतर वजन का वाढतं? वाढल्यास ते लगेच कमी करणे बाळासाठी ठरेल...

फुफ्फुसांचा कँसर

कँसरच्या आजारात फुफ्फुसांचं दुखणं अगदीच साधारण आहे. साधारणत: फुफ्फुसांचं दुखणं दोन प्रकारचं असतं. नॉन स्मॉल लंग कँसर आणि स्मॉल सेल लंग कँसर.

त्यामुळे पाठदुखी हलक्यात घेऊ नका.