

Down syndrome is a genetic condition caused by an extra copy of chromosome 21. With early intervention, medical care, therapy, education and family support, children with Down syndrome can develop skills and lead fulfilling lives.
sakal
डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
डाऊन सिंड्रोम (Down Syndrome) हा आजार जन्मत: असलेल्या पेशीतील गुणसूत्राच्या दोषामुळे होतो. गर्भधारणेदरम्यान पेशीविभाजनातील अनपेक्षित त्रुटींमुळे (Random Cell Division Error) होतो. आपल्या शरीरातील पेशींत २३ गुणसूत्रांच्या जोड्या असतात, त्या गुणसूत्रात २३ वे गुणसूत्र हे सेक्स क्रोमोझोम (X and Y) असते. डाऊन सिंड्रोम असलेल्या बालकात २१ व्या गुणसूत्राच्या जोडीत एक अधिक म्हणजे दोनच्या जागी तीन (Trisomy 21) गुणसूत्रे असतात. जगभरात जन्मलेल्या आठशे बालकामधून एका बालकांत हा दोष आढळून येतो. या सिंड्रोमचे विशिष्ट असे कारण नाही; पण आईच्या वाढत्या वयाबरोबर सिंड्रोमचे प्रमाण वाढते. आईचे वय ३५ किंवा अधिक असल्यास याची शक्यता वाढते.