

Spine Care: Dr. Ajay Kothari Shares Critical Insights on Managing Sudden Back Pain
Sakal
डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन
एक क्षणात सगळं बदलतं. सकाळी नीट उठलेला माणूस अचानक वाकताना, काहीतरी उचलताना किंवा उठताना तीव्र पाठदुखीने थांबतो. हालचाल करता येत नाही, बसणं-उठणं कठीण होतं आणि मनात भीती निर्माण होते - ‘काही गंभीर झालंय का?’
अचानक येणारी पाठदुखी ही नेहमीच मोठ्या आजाराची चिन्ह नसते, पण पहिल्या काही तासांत योग्य काळजी घेतली नाही, तर ही वेदना दीर्घकाळ टिकू शकते.