शरीरशास्त्र : आधुनिक तंत्रज्ञान मणक्यासाठी वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boon for the spine

डॉक्टर मला मणक्याच्या ऑपरेशन नंतर चालता येईल ना? अर्धांगवायू तर होणार नाही ना? हे प्रश्न एकविसाव्या शतकातही विचारले जातात, त्यावर माझे उत्तर असते ‘होय’.

शरीरशास्त्र : आधुनिक तंत्रज्ञान मणक्यासाठी वरदान

डॉक्टर मला मणक्याच्या ऑपरेशन नंतर चालता येईल ना? अर्धांगवायू तर होणार नाही ना? हे प्रश्न एकविसाव्या शतकातही विचारले जातात, त्यावर माझे उत्तर असते ‘होय’.

एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) - हे Robotics Neuro Navigation Neuromonitoring चे युग आहे. २०-३० वर्षांपूर्वी या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. एक कुशल सर्जन व आधुनिक तंत्रज्ञान यांची जोड मिळाल्यास उत्कृष्ट ऑपरेशन होते व पेशंट पूर्ण बरा होतोच होतो.

काय आहे एआय तंत्रज्ञानात?

1) रोबोटिक मणक्याची शस्त्रक्रिया - यामध्ये नव्या पिढीचे रोबो ऑपरेशन टेबलवर रुग्णाचे स्कॅन करून रुग्णाच्या शरीर रचनेची पूर्ण माहिती मिळवतात. आणि शल्यविशारद मणक्याच्या भागातील दोष रोबोच्या मदतीने नोंदवतात. त्यानंतर रोबो अचूकपणे त्या भागाची शस्त्रक्रिया करण्यास मदत करतात. हे करीत असताना सर्जन ऑपरेशन थिएटरमध्ये स्वतः सहभागी घेऊन त्यावर बारकाईने लक्ष देतो व रोबोला मार्गदर्शन करतो. शस्त्रक्रिया झाल्यावर ऑपरेशन थिएटरमध्ये परत स्कॅन करून त्या भागात झालेले बिघाड पूर्ण दुरुस्त झाल्याची खात्री करून घेतात. Special Instrumentation/ implantation म्हणजे काही इम्प्लांट करायचे असल्यास या प्रक्रियेचा मोठा फायदा होतो. त्या व्यतिरिक्त मणक्याचे ट्यूमर्स, व्यंग (Scoliosis and Kyphosis), फ्रॅक्चर्स, जंतुसंसर्ग, रिव्हिजन स्पाइन सर्जरी, C-१-C -२ सर्जरी, मानेच्या नाजूक भागातील ऑपरेशनमध्ये या तंत्रज्ञानाची मदत होते.

2) ‘O’ Arm & Neuro Navigation - ‘O’ Arm हे OT मध्ये असणारे सीटी स्कॅन आहे. ऑपरेशन सुरू करण्याआधी ऑपरेशन थिएटरमध्येच स्कॅन केले जाते व ती माहिती न्यूरो नेव्हिगेशनला पोहचवली जाते. हे न्यूरो नेव्हिगेशन मशिन ऑपरेशन करताना सर्जनला इम्प्लांटेशन करताना किंवा नस मोकळ्या करण्यास व अचूक ऑपरेशन करण्यास मदत करतो. ऑपरेशन संपल्यावर परत तेथेच स्कॅन करून ऑपरेशनची उपयुक्तता व ते योग्य झाल्याचे निश्‍चित केले जाते. त्यामुळे यशस्वी ऑपरेशन होण्यास संपूर्ण मदत मिळते.

3) न्यूरोमॉनिटरिंग - मणक्याचे ऑपरेशन होत असताना मणक्याच्या Electrophysiological करंटवर, जे संवेदना व स्नायूंना ताकद देण्यासाठी कारणीभूत असते, त्यावर संपूर्ण ऑपरेशन दरम्यान एक डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवत असतो. नसांवर किंवा मणक्यावर दबाव आल्यास लगेच Neuromonitoring निदर्शनास आणून देते व मणक्याला इजा होण्यापासून रोखू शकतात. त्यावर उपाययोजना करून एक सुरळीत व सुरक्षित ऑपरेशन पार पडते. त्यामुळे Neuromonitering या मशिनद्वारे मणक्याच्या व मेंदूच्या ऑपरेशनमध्ये क्रांती झाली आहे. मणक्याचे ऑपरेशन सुरक्षित व प्रभावी होण्यास याची मदत झाली आहे.

4) Advanced Microscopes - यांद्वारे छोटीशी नससुद्धा मोठ्या दोरीसारखी दिसते. त्यावर भरपूर प्रकाशही असतो. त्यामुळे छोट्या केसांसारख्या नसांवर प्रभावीपणे ऑपरेशन करून, छोट्या छिद्रातून व जास्त चिरफाड न करता ऑपरेशन सहज शक्य आहे.

5) Operating Endoscopes - छोट्या छिद्रातून जास्त रक्तस्राव न करता, चिरफाड न करता एक छोटा Endoscope टाकून मणक्याची शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये रुग्णाची रिकव्हरी जलद होते. हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज पडत नाही. रुग्ण पटकन कामाला रुजू होऊ शकतो.

6) Ultra sonic Bone Scalpel Piezo electric Spine Surgery - मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये Piezo electric Technology द्वारे अचूकता व कमीत कमी वेळात मणक्याच्या मोठ्या शस्त्रक्रियेत मणक्याच्या हाडांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात मदत मिळते.

(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणका तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :health