शरीरशास्त्र : मणक्याबद्दल समज आणि गैरसमज

मणक्याचे आजार, त्याच्या चाचण्या व उपचारांसंदर्भात रुग्णांच्या मनात अनेक शंका असतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न आपण या लेखात करू.
Spine
SpineSakal
Summary

मणक्याचे आजार, त्याच्या चाचण्या व उपचारांसंदर्भात रुग्णांच्या मनात अनेक शंका असतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न आपण या लेखात करू.

मणक्याचे आजार, त्याच्या चाचण्या व उपचारांसंदर्भात रुग्णांच्या मनात अनेक शंका असतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न आपण या लेखात करू.

संधीवात फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये होतो -

चूक, संधीवात दोन प्रकारचा असतो. एक, जो वयानुसार होतो, जसे गुडघ्याच्या संधीवात किंवा मणक्याचा स्पॉंडिलायसिस. मात्र, दुसऱ्या प्रकारचा संधीवात आपल्या रक्तात असतो व तो तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. रक्तातील संधीवात आपल्या हाडावरती सूज निर्माण करून त्याचे रूपांतर संधीवातात करतो. उदा. Ankylosing spondylitis Rhevmato Arthnti. हे संधीवात तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसतात.

एमआरआय अधिक वेळा केल्यास शरीराला धोका निर्माण होतो -

चूक, कारण एमआरआयमध्ये हानिकारक क्ष किरणांचा वापर केला जात नाही. त्यामध्ये मॅग्नेटिक रेजचा वापरू करून शरीरातील विविध भागांतील तपासणी केली जाते. त्यांचे कोणत्याही अवयवावर दुष्परिणाम होत नाहीत. याउलट सीटी स्कॅन व एक्सरे वारंवार केल्यास क्ष किरणांच्या वापरामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या कराव्यात.

मणक्यावरील किंवा हाडावरील ऑपरेशनमध्ये टाकलेले प्लेट, रॉड, क्लीप काढणेही आवश्यक असते. आता ऑर्थोपेडिक्स व स्पाइनमध्ये वापरण्यात येणारे इम्प्लांट्स उच्च प्रतिचे टिटॅनियम कोबाल्ट क्रोम व स्टेनलेस स्टील वापरून बनवलेले असतात. त्यामुळे हाडांवरील बहुतांश शस्त्रक्रियांनंतर इम्प्लांट काढण्याची गरज पडत नाही. इम्प्लांट शरीरात राहिल्याने काहीही धोका निर्माण होत नाही.

मणक्यावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर २ ते ३ महिने झोपून राहावे लागते -

चूक, मणक्यावरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही तासांतच रुग्ण चालायला लागतो. अत्याधुनिक शस्त्रक्रियांमुळे बेड रेस्टची गरज नसते.

अधिक व्यायाम केल्यास शरीर सुदृढ होते -

चूक, अति तेथे माती, हेच खरे. शरीरातील हाडे, स्नायू, लिगामेंटची ताण सहन करण्याची एक क्षमता असते. अति व्यायाम केल्यास त्यांची लवकर झीज होऊन आरएसआय (रिपिटिटिव्ह स्ट्रेस इन्ज्युरी) होते व त्यामुळे फायदा कमी आणि नुकसानच अधिक होत.

हाडांची ठिसूळता (ऑस्टिओपोरोसिस) बरी होऊ शकत नाही -

चूक, आता Paratuyroid hormone injections, Denusumab injectionsm Bisphosphonatr या नवीन उपचार पद्धतीमुळे हाडांची ठिसूळता नियंत्रणाखाली ठेवता येते व ती बरीही होऊ शकते.

रोज कॅल्शिअमची गोळी घेतल्यास हाडे ठिसूळ होत नाहीत -

चूक, कॅल्शिअम हा हाडांतील प्रमुख घटक आहे, मात्र नुसती कॅल्शिअमची गोळी खाऊन हाडे मजबूत होत नाहीत. त्यासोबत नियमित व्यायाम, व्हिटॅमिन डी-३ व आधुनिक गोळ्या व इंजेक्शने घेणे गरजेचे असते. Dexa Scan केल्यास त्यानुसार T score ची लेव्हल पाहून तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे उपचार करणे गरजेचे आहे.

हाडे व मणक्यासाठी स्टेरॉइड्स अत्यंत घातक आहेत.

स्टेरॉइड्स अति प्रमाणात व किंवा अधिक काळ घेतल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. ते कमी डोसमध्ये व कमी कालावधीसाठी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास त्याचे फायदे अधिक होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com