
वाढत्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा यामुळे वयोमर्यादा वाढली आहे, त्यामुळे वयोवृद्ध लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या वयाबरोबर येणारे हाडांचे व मणक्याचे आजारही वाढत आहेत.
शरीरशास्त्र : ज्येष्ठ नागरिक आणि मणक्याचे आजार
वाढत्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा यामुळे वयोमर्यादा वाढली आहे, त्यामुळे वयोवृद्ध लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या वयाबरोबर येणारे हाडांचे व मणक्याचे आजारही वाढत आहेत. या लेखात आजार आपण कसे टाळू शकतो आणि झाल्यास काय उपचार करू शकतो हे पाहणार आहोत.
काय आहेत वयोवृद्ध लोकांच्या समस्या?
पाठ दुखी (कंबर दुखी)
मानदुखी
हाडांची ठिसुळता
मणक्याचे फ्रॅक्चर
वयानुसार होणारे मणक्याचे बाक
मधुमेह, कंपवात, नैराश्य, विस्मरण, थॉयराइड, उच्च रक्तदाब यामुळे हाडांवर होणारे विपरीत परिणाम.
मणक्याच्या नसावर दबावामुळे होणारे दुष्परिणाम ः चालण्यास असुविधा, लघवी व संडासवरील ताबा सुटणे. हाता-पायामध्ये येणाऱ्या कमजोरीमुळे चालणे बंद होणे.
उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला
आहार : व्हिटॅमिन व जास्त प्रथिने युक्त आहार.
व्यायाम : दररोज ४५ मिनिटे ते १ तास नियमाने व्यायाम करणे.
एकदम ४५ मिनिटे किंवा १ तास व्यायाम करण्याऐवजी दोन किंवा तीन टप्यात व्यायाम जास्त योग्य. चालणे, सर्व जॉईन्टस दहा वेळा फिरवणे (घड्याळ्याच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने) प्राणायाम करणे गरजेचे आहे.
रोज सकाळी एक तास उन्हात बसणे. व्हिटॅमिन-डीसाठी सकाळी ११ ते २ पर्यंत.
ऑस्ट्रोपोरायसिसवर योग्य उपचार घेणे.
कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी३च्या गोळ्या आणि कॅल्शिअमचे इंजेक्शन हाडांची घनता तपासणे. (वर्षातून एकदा)
दरवर्षी किंवा दोन वर्षातून एकदा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण शरीराची तपासणी करून घेणे. त्यामुळे साठीनंतरचे टाळण्यासारखे किंवा लवकर निदान होऊन उपचार करण्यासारखे आजार आहेत त्यावर मात होऊ शकते.
चालताना वॉकर किंवा काठी वापरावी.
बाथरूममध्ये ॲण्टिस्किड टाइल्स वापराव्यात.
जिन्यावर रेलिंग असावेत.
झोपून उठल्यावर ३० सेकंद १ मिनिटे थांबून मग उभे राहून सावकाश चालायला सुरूवात करावी. यामुळे चक्कर येऊन पडण्याचे प्रमाण कमी होते.
मणक्याचे त्रास सुरू झाल्यास, अंगावर काढण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याचे परिक्षण व निदान केल्यास, त्याचे निवारण योग्य व लवकर होऊ शकते.
(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणका तज्ज्ञ आहेत.)