मनाची शक्ती : आम्लपित्ताची लक्षणे आणि उपाय

आम्लपित्ताची लक्षणे पोटातील जठरासंबंधी ग्रंथींद्वारे अॅसिडच्या अतिरिक्त निर्मितीमुळे दिसतात. आपले शरीर अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिड निर्माण करते.
Acidosis
Acidosissakal
Updated on

- डॉ. हंसा योगेंद्र

आम्लपित्ताची लक्षणे पोटातील जठरासंबंधी ग्रंथींद्वारे अॅसिडच्या अतिरिक्त निर्मितीमुळे दिसतात. आपले शरीर अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिड निर्माण करते. आम्लपित्तयुक्त पदार्थ, अल्कोहोल, निर्जलीकरण आणि तणाव यासारख्या ट्रिगर्समुळे शरीरात अतिरिक्त आम्लाची निर्माण होते. नैसर्गिकरीत्या कायमस्वरूपी आम्लपित्तापासून मुक्त होण्यासाठीच्या तंत्राची माहिती घेऊयात.

अन्न

  • प्रत्येक जेवणानंतर गुळाचा एक छोटा तुकडा चाखा. गुळामुळे शरीराचे तापमान सामान्य राहते आणि पोट थंड होते.

  • गायीचे एक कप थंड दूध किंवा बदामाचे दूध प्या. दूधामुळे शरीरातील आम्ल शांत होते.

  • नारळ पाणी, ताक, केळी आणि सफरचंद पोट शांत करण्यासाठी चांगले आहेत.

खाण्याच्या योग्य सवयी

  • जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर एक तासानंतर पाणी प्यावे. झोपण्यापूर्वी आणि उठल्याबरोबर कोमट पाणी प्या.

  • जेवणानंतर काही काळ ताठ बसावे. पचनाला चालना देण्यासाठी हलके चालावे. जेवण झाल्यावर लगेच झोपणे टाळा.

  • काही प्राणायाम किंवा श्वासोच्छवासाची तंत्रे शीतलता आणतात आणि शरीराबरोबर मनामध्ये संतुलित अवस्था निर्माण करतात.

  • चंद्रभेदन प्राणायाम पित्त प्रवाह नियंत्रित करते आणि पोटाबरोबर मनात शांतता निर्माण करते.

  • शीतली प्राणायामामध्ये जीभ कुरवाळून तयार झालेल्या नळीच्या साहाय्याने तोंडातून श्वास घेणे समाविष्ट असते. हे ओटीपोटाचे आजार बरे करते आणि त्यामध्ये जमा झालेली अतिरिक्त उष्णता काढून टाकते.

  • सीतकरी प्राणायामामध्ये दात तयार करून तोंडातून श्वास घेणेदेखील समाविष्ट आहे. हा प्राणायाम थंडावा देणारा असून मानसिक तणावही कमी करतो.

सकाळची आसने

  • पवनमुक्तासन आतड्यांच्या हालचालींना उत्तेजित करते. आपल्या पाचन तंत्रातून टाकाऊ पदार्थ आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

  • हस्तपांडंगुष्टासन पोटाच्या आंतरसंकुचन देते आणि पचनसंस्थेला उत्तेजित करते.

  • सुप्तकपोतासन पचन सुधारून आम्लपित्ताच्या लक्षणांपासून आराम देते आणि उदराच्या भागात रक्तप्रवाहाचा वेग वाढवते.

  • मकरासन पोटातील आम्ल निष्प्रभ करते. जेवणाच्या अर्धा तास आधी हे आसन करणे उत्तम.

  • शवासनामध्ये आराम करणे महत्त्वाचे आहे, कारण ते स्नायू आणि ताण कमी करते आणि मन उत्साही करते.

नोंद करणे

  • तुम्ही खाल्लेला कोणताही खाद्यपदार्थ, तुम्ही केलेल्या क्रिया किंवा आम्लपित्तांना चालना देणाऱ्या विचारांची एका डायरीत नोंद करा. अशा प्रकारे आत्मपरीक्षण केल्यावर काय ठेवायचं आणि काय सोडायचं हे लक्षात येईल. आयुष्यात कशासाठी कृतज्ञ आहात याची काही कारणे दररोज लिहा. हे तुम्हाला तणाव आणि नकारात्मकतेपासून दूर ठेवेल, ते आम्लपित्ताचे प्रमुख कारण आहे. कारण शरीर आणि मन यांच्यात मजबूत संबंध असतात. त्यामुळे योग्य निवड करा आणि आम्लपित्ताच्या लक्षणांपासून स्वतःला कायमचे मुक्त करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com