

Understanding Spondylolisthesis: When Vertebrae Slip Out of Place
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ (मेंदू आणि स्पाईन सर्जन)
आरोग्य‘चेतना’
मागच्या आठवड्यात लिहिलेल्या लेखामधल्या लक्षणाप्रमाणे दिसणारी लक्षणं असणारा मणक्याचा आणखी एक आजार म्हणजे स्पाँडिलोलिस्थेसिस. ‘‘डॉक्टर, गेले काही महिने माझी कंबर विलक्षण दुखते आहे... खरंतर याची सुरुवात दीड वर्षापूर्वी झाली. मी भाजी आणायला म्हणून बाहेर पडले आणि नेहमीचा भाजीवाला नव्हता म्हणून दीड किलोमीटर चालत पुढे गेले. घरी परत येताना कमरेचा खालचा भाग दुखायला लागला आणि मांड्या व पोटऱ्या यात जडपणा जाणवायला लागला.