आरोग्य‘चेतना’ : दबलेल्या नसेची असह्य वेदना

ट्रायजेमिनल न्युराल्जिया : चुकीच्या निदानामुळे वाढणारी ‘आत्महत्या-प्रेरक’ वेदना, एमव्हीडी शस्त्रक्रियेने मुळावर घाव घालण्याचा विज्ञाननिष्ठ मार्ग
The World's Most Intense Pain: Understanding Trigeminal Neuralgia and Its Cure

The World's Most Intense Pain: Understanding Trigeminal Neuralgia and Its Cure

Sakal

Updated on

डॉ. जयदेव पंचवाघ मेंदू आणि स्पाइन सर्जन

गेल्या आठवड्यातील लेखात आपण ‘ट्रायजेमिनल न्युराल्जिया’ या जगातील सर्वांत तीव्र वेदनेची तोंडओळख करून घेतली होती. आता इतर मुद्द्यांचा विचार करू.

नुकत्याच पार पडलेल्या एमव्हीडी शस्त्रक्रियेपासून सुरू करू. ही शस्त्रक्रिया करताना, मेंदूच्या खोलवर असलेल्या ‘पॉन्स’ नावाच्या भागावर (ब्रेन स्टेमचा एक भाग) आम्ही न्युरोमायक्रोस्कोपचा प्रखर झोत वळवला. चेहऱ्याच्या उजव्या बाजूची संवेदना वाहून नेणारी ‘ट्रायजेमिनल नस’ ज्या ठिकाणी मेंदूत प्रवेश करते, तो भाग स्पष्ट दृष्टिक्षेपात आला. नसेच्या त्या अत्यंत नाजूक भागावर एका मोठ्या रक्तवाहिनीचा इतका तीव्र दाब होता, की ती नस एखाद्या चिंधीसारखी चपटी झाली होती. रक्तवाहिनी नसेच्या पोटात खोलवर रुतल्यामुळे नसेचे तंतू अक्षरशः विलग झाले होते. प्रत्येक मिनिटाला ७५-८० वेळा त्या रक्तवाहिनीची स्पंदनं नसेवर आदळत होती. गेली अनेक वर्षे हा दाब सतत वाढत गेल्याने ही भयानक स्थिती ओढवली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com