वसा आरोग्याचा : महिलांच्या आरोग्य समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women

एक निरोगी स्त्री ही ‘आनंदी स्त्री’ आहे, असे म्हटले जाते. परंतु महिला आपल्या शारीरिक परिवर्तनाकडे लक्ष देतात का?

वसा आरोग्याचा : महिलांच्या आरोग्य समस्या

- डॉ. कोमल बोरसे

एक निरोगी स्त्री ही ‘आनंदी स्त्री’ आहे, असे म्हटले जाते. परंतु महिला आपल्या शारीरिक परिवर्तनाकडे लक्ष देतात का? आयुष्यभर, स्त्रीच्या शरीरात प्रचंड बदल घडतात, आपण जगण्यात इतके व्यग्र होतो की, आपण अजिबातच लक्ष देत नाही. भारतीय महिलांच्या जीवनशैलीत स्वत-पेक्षा तिला कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागते. आपण महिलांच्या काही समस्यांबद्दल चर्चा करूयात.

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग अनेक कारणांमुळे होतो. त्यापैकी काही हार्मोनल आणि पर्यावरणीय बदलांचा समावेश होतो.

 • तपासणी - मॅमोग्राम आणि ‘एमआरआय’द्वारे केली जाऊ शकते.

 • उपचार - लम्पेक्टॉमीद्वारे (स्तनाच्या कर्करोगासाठी ट्यूमर काढण्याची पद्धत)

 • मास्टेक्टॉमी - संपूर्ण स्तन शस्त्रक्रियेने काढून टाकणे.

 • स्कीन-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी - स्तन, एरोला आणि स्तनाग्र कापले जातात आणि त्वचा शाबूत राहते.

कर्करोग टाळण्यासाठी

आपला आहार हा साधा संतुलित असावा.

कोणतेही केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह रंग, वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेट फूड, अजिनोमोटो टाळले पाहिजे.

हृदयरोग

हा सामान्यपणे आढळणारा विकार आहे.

हृदयविकाराची कारणे -

 • रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होणे.

 • मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास, नैराश्य, किडनीचे आजार आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना हृदयविकार होण्याचा धोका जास्त असतो.

 • तपासणी -

 • इसीजी, ट्रेडमिल चाचणी, कोरोनरी अँजिओग्राम

 • उपचार -

 • तळलेले पदार्थ आणि मीठ यांचे सेवन कमी करा.

 • बेकरी पदार्थांमध्ये वापरला जाणारा ‘मार्गरिन’ हा घटक हृदयासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे बेकरी पदार्थ टाळावेत.

 • आठवड्यातून किमान ४ ते ५ दिवस व्यायाम करा.

 • सावधगिरी - कोलेस्ट्रॉल नियंत्रण, रक्तदाब निरीक्षण, तणाव, मधुमेह व्यवस्थापन आहार नियंत्रण

नैराश्य

कधी कधी उदास किंवा कमी वाटते, हे स्वाभाविक आहे. या भावना दीर्घकाळ राहिल्यास त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर होतो.

 • कारणे - आनुवंशिक, ताणपोषणाची कमतरता, मेंदूचे रसायनशास्त्र असंतुलन, क्लेशकारक घटना, शारीरिक आरोग्य समस्या, संप्रेरक असंतुलन

लठ्ठपणा

महिलांमध्ये लठ्ठपणा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममुळे होऊ शकतो. लठ्ठ स्त्रीला मधुमेह आणि हृदयविकार होण्याचा धोका असतो.

 • कारणे - आनुवंशिक, ताणनिष्क्रियता, औषधे, नैराश्य, हृदयरोग, कर्करोग

 • तपासणी - बॉडी मास इंडेक्स (BMI).

 • उपचार -

 • व्यायाम, आहार, जीवनशैलीत बदल, औषध, शस्त्रक्रिया, योग्य आहार घ्या, मिठाई, तळलेले पदार्थ टाळा, शारीरिक हालचाली करा.

 • आठवड्यातून किमान चार दिवस ४५ ते ६० मिनिटे हालचाल करण्याचे लक्ष्य ठेवा.

 • एरोबिक किंवा कार्डिओ, व्यायाम सर्वोत्तम. (चालणे, जॉगिंग, नृत्य, पोहणे)

ऑस्टिओपोरोसिस

ऑस्टिओपोरोसिस हाडांच्या क्षीणतेमुळे होतो आणि परिणामी फ्रॅक्चर होऊ शकते. ३५ वर्षे वयाच्या महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस सामान्य आहे.

 • कारणे - वृद्धापकाळ, कॅल्शिअमची कमतरता, हार्मोनल असंतुलन, हायपरथायरॉईडीझम, ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता.

 • उपचार -

 • योग्य व्यायाम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी पूरक आहार

 • जड उचलणे, तीव्र व्यायाम टाळा. एकदम वाकू अथवा वळू नये.

मधुमेह

मधुमेह हा चयापचय विकार आहे. शरीर पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही तेव्हा ही समस्या निर्माण होते. मधुमेह हा दोन प्रकारचा प्रकार-१, प्रकार २ आणि गर्भधारणा मधुमेह आहे.

 • कारणे - जास्त वजन, आनुवंशिक, व्यायामाचा अभाव, उच्च कोलेस्टरॉल, उच्चरक्तदाब, गरोदरपणातील मधुमेह, हायपरथायरॉईडीझम, पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम

 • तपासणी - HbA१c चाचणी

 • उपचार - इन्शुलिन शॉट्स, गोळ्या, व्यायाम, आहार आणि वजनावर नियंत्रण

टॅग्स :womenhealth