वसा आरोग्याचा : शिळे अन्न नकोच...!

आयुर्वेदात शिळे अन्न तामसिक मानले जाते. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीर आळशी होते. साधारणपणे अन्न शिजवल्यानंतर काही तासांतच खाल्ले गेले पाहिजे.
Stale foods
Stale foodssakal
Summary

आयुर्वेदात शिळे अन्न तामसिक मानले जाते. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीर आळशी होते. साधारणपणे अन्न शिजवल्यानंतर काही तासांतच खाल्ले गेले पाहिजे.

- डॉ. कोमल बोरसे

आयुर्वेदात शिळे अन्न तामसिक मानले जाते. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीर आळशी होते. साधारणपणे अन्न शिजवल्यानंतर काही तासांतच खाल्ले गेले पाहिजे. जेणेकरून शरीराला अन्नामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांचा फायदा मिळू शकेल. शिळे अन्न खाल्ल्यामुळे शरीराला दोन प्रकारे अपाय होतो. एक म्हणजे पचनशक्तीशी निगडित आजार आणि वजन वाढू शकते. काही दिवसांपूर्वी एक पेशंट म्हणाली, ‘‘मॅडम माझे वजन कमी न होता वाढत चालले आहे, मी तुम्ही दिलेला आहार तक्ता व्यवस्थित फॉलो केला. आणि व्यायामही करत आहे.’’ ते ऐकल्यावर मला प्रश्न पडला, ‘असे कसे झाले?’ आजपर्यंत असे झाले नाही म्हणून मी तिला आदल्या दिवशी दिवसभरात काय खाल्ले हे सविस्तर सांगण्याची विनंती केली. तिने पूर्ण दिवसाचा आहार सांगितल्यावर माझ्या लक्षात आले, की ती मी दिलेला आहार तंतोतंत घेत आहेच. मात्र, बाकीच्यांचे उरलेले शिळे अन्न देखील खात आहे. मी दिलेला आहार तिच्या गरजेनुसार होता.

परंतु ती खात असलेल्या अन्नाची शरीराला आवश्यकता नव्हती. त्यामुळे ती अतिरिक्त ऊर्जा चरबीमध्ये रूपांतरित होत गेली आणि तिचे चरबीयुक्त वजन वाढले. अन्न संपविण्याच्या नादात केलेला व्यायामही उपयुक्त ठरलेला नाही. हे असे कायम राहिल्यास पुढे जाऊन मधुमेह, थायरॉईड, रक्तदाब यासारखे आजार ओढवले जातील, हे सांगितले.

शिळे अन्न : कारणे आणि उपाय

  • अन्न वाया जात असल्यास बनवतानाच योग्य नियोजन करावे.

  • एखाद्या दिवशी कमी पडल्यास सलाड, ताक घेऊन पोट भरू शकते.

  • अनेक महिला (विशेषतः गृहिणी) शिळे अन्न संपविण्याची जबाबदारी घेतात. यामुळे त्यांचे वजन वाढते.

  • कालांतराने गुडघेदुखी सुरू होते. त्यामुळे व्यायाम होत नाही. व्यायाम कमी असल्यामुळे पुन्हा वजन वाढते.

  • वयाच्या पंचेचाळीशीनंतर मेनोपॉजमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे अजून वजन वाढते.

  • शिळे अन्न हे कफ आणि पित्त वृद्धीकर आहे. त्यामुळे अग्निमंद होतो म्हणजेच पचनशक्ती कमी होते.

  • पचनशक्तीवर परिणाम झाल्याने सर्व धातूंवर परिणाम होतो आणि अनेक आजार निर्माण होऊ शकतात.

  • अन्न आदल्या दिवशी तयार करून दुसऱ्या दिवशी खाल्ले जाते. तेव्हा त्याला किमान तीन ते चार वेळा गरम केले जाते. त्यामुळे त्यामधील पोषणद्रव्ये निघून जातात. चरबी मात्र तशीच राहते.

ताज्या अन्नाचे फायदे

  • ताजे व गरम पदार्थ खाल्ल्याने भूक वाढते.

  • पचन व्यवस्थित होते.

  • आवश्यक ते पोषक घटक शरीराला मिळतात.

  • अन्न रुचकर व चविष्ट लागते.

  • पोट साफ होण्यास व मल-मुत्राचे निसःरण योग्यरीत्या होण्यास मदत होते. त्यामुळे शरीर हलके होते.

  • शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com