

Understanding Muscle Cramps: The Ayurvedic Perspective of 'Pindikodveshtana'
Sakal
डॉ. मालविका तांबे
बऱ्याच लोकांना रात्री झोपेमध्ये किंवा दिवसा सुद्धा पायांमध्ये गोळे येण्याचा त्रास खूप प्रमाणात होताना दिसतो. याच्यात होणाऱ्या वेदना कधी कधी इतक्या असहनीय असतात की रात्रीची झोप सुद्धा लागत नाही किंवा दिवसभरात करता येण्यासारखे सामान्य काम सुद्धा करणं अवघड होत जातं. आयुर्वेदाप्रमाणे कुठलंही दुखणं आहे ते वातामुळेच होतं. काही कारणांमुळे जेव्हा वातदोष प्रकुपित होऊन मांस धातुमध्ये स्थित होतो अशा प्रकारचे पेटके यायला सुरू होतात. ह्याला आयुर्वेदामध्ये पिंडिकोद्वेष्टन असा शब्द सुद्धा वापरला गेलेला आहे.