आजारांच्या उच्चाटनाची संकल्पना

आजार होताना शरीरामध्ये जे बदल शरीररचना, क्रिया आणि रासायनिक प्रक्रियेमध्ये तयार झाले आहेत.
Sickness
Sicknesssakal

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

आजार होताना शरीरामध्ये जे बदल शरीररचना, क्रिया आणि रासायनिक प्रक्रियेमध्ये तयार झाले आहेत, त्यांचं मूळ कारण शोधलं व ते कारण काढून टाकलं, तर हे तयार झालेले बदल आपण उलट फिरवू शकतो किंवा ते घडण्यापासून थांबवू शकतो, यालाच ‘डिसीज रिव्हर्सल’ म्हणतात.

या बाबतीत मी अनुभवलेलं सर्वांत सुंदर उदाहरण सांगते. गोष्ट आहे कोविड १९ च्या दरम्यानच्या लॉकडाऊनची. तेव्हा अनेक दिवस रस्त्यांवरून गाड्या चालवल्या गेल्या नव्हत्या व त्यामुळे धूळ व प्रदूषण खूप कमी झालं होतं. याचा अनपेक्षित; पण चांगला परिणाम असा झाला, की रस्त्याच्या बाजूच्या झाडांची प्रकृती सुधारली, त्यांची वाढ वेगानं होऊ लागली, फांद्यांची मजबुती वाढली, पानं तजेलदार दिसू लागली, पानगळ कमी झाली. रस्त्यांवर फुलांचा सुंदर सडा पडू लागला...

म्हणजेच झाडांच्या प्रकृतीसाठी चांगलं नसलेलं प्रदूषण काढून टाकण्यात आलं, तेव्हा झाडांमधील आजारांचं प्रमाण कमी होऊन ते आपोआप आरोग्यपूर्ण बनलं. यासाठी आपल्याला कुठलंही नवं खत घालावं लागलं नाही, कोणताही शेतीचा प्रयोग करावा लागला नाही... ते निसर्गनियमानं आपोआपच आरोग्यपूर्ण बनलं. तसंच आपल्याही आयुष्यातील बरेच आजार हे आपण निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण करणाऱ्या गोष्टी करतो म्हणून उत्पन्न होतात. त्या गोष्टी जाणीवपूर्वक कमी करता आल्या, तर निसर्ग त्या झाडांप्रमाणेच आपल्याही प्रकृतीमध्ये आपोआप पूर्ववत स्वास्थ्यसुस्थिती निर्माण करतो.

शिक्षणानं एक ॲलोपॅथिक डॉक्टर असूनदेखील मी नैसर्गिकरीत्या होणाऱ्या हिलिंगविषयी भाष्य करते, औषधोपचारापेक्षा डिसीज रिव्हर्सलला प्राधान्य देते म्हणून अनेकांना वाटतं, की माझी मतं माझ्या पॅथीला अनुसरून नाहीत. पण तसं नाहीये! मॉडर्न मेडिसिनचे जनक हिप्पोक्रेट्स यांनी २५०० वर्षांपूर्वी आजार आणि आरोग्याबद्दल ७० हून अधिक पुस्तकं लिहून वैद्यकीय क्षेत्राला मोठं योगदान दिलं आहे; त्यांची त्या काळातील काही महत्त्वाची विधानं आपण पाहूया :

  • आपल्यातील नैसर्गिक शक्ती ही बरे होण्यासाठी सर्वांत मोठी शक्ती आहे.

  • आजार अचानक येत नाहीत. ते निसर्गाच्या विरुद्ध लहान दैनंदिन पापांमधून विकसित होतात. पापे जास्त प्रमाणात जमा होतात, तेव्हा आजार अचानक प्रकट होतात.

वैद्यकीयशास्त्राच्या जनकानंच आपल्याला निसर्गाची मदत घेऊन आजाराचा समूळ उच्चाटन करण्यास सांगितलं आहे, तर वाट कशाची पाहायची?आपण आपल्या आरोग्याबाबत जागरूक होऊन जुनाट आजाराला परत पाठवूया!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com