World Cancer Day : सकारात्मक जीवनशैलीच रोखेल कर्करोग

कर्करोग हा शब्द जरी उच्चारला तरी मनात उभे राहते, ते मृत्यूचे चित्र. कर्करोगासारखा दुर्धर आजार झाला, की आपण स्वत:ला उपचारांसाठी डॉक्टरांकडे सोपवितो आणि स्वतःला हेल्पलेस (हतबल) समजतो.
World Cancer Day
World Cancer Daysakal

कर्करोग हा शब्द जरी उच्चारला तरी मनात उभे राहते, ते मृत्यूचे चित्र. कर्करोगासारखा दुर्धर आजार झाला, की आपण स्वत:ला उपचारांसाठी डॉक्टरांकडे सोपवितो आणि स्वतःला हेल्पलेस (हतबल) समजतो. आपण काहीच करू शकत नाही, ही मानसिकता आजार बरा करण्यातील अडथळा ठरते. आपण बरे होऊ शकतो, ही सकारात्मक मानसिकता, योग्य आहार, व्यायाम, ध्यान, पॉझिटिव्ह इमॅजिनेशन, चुकीच्या जीवनपद्धतीत बदल करणे, ताणतणावाचे व्यवस्थापन या छोट्या वाटणाऱ्या बाबीही उपचारपद्धतीत सहायक ठरतात. या बाबी रुग्णाला केवळ बरे करण्यासाठी उपयुक्त नव्हे, तर निरोगी जीवन जगण्याचा मार्ग ठरू शकतात.

कर्करोगग्रस्तांची वाढती संख्या ही जगापुढे मोठी समस्या आहे. हा आजार झोपडीतही पोचला. कर्करोग हा असाध्य समजला जाणारा आजार रुग्णांवर शारीरिक आणि मानसिक आघात करतो. मन व शरीर यांचा जवळचा संबंध असल्याने या आजारातून बाहेर पडणे हे आपल्या हातात नसल्याची असहाय्यतेची, निराशेची भावना निर्माण होते. कर्करोगाकडे यांत्रिक पद्धतीने पाहत असल्याने मनातील नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करतो. या भावना आपल्यातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमकुवत करतात. आपण कर्करोगाला समजून घेऊन घेत असलेल्या उपचाराला वैज्ञानिक पद्धतीच्या प्रयत्नांची जोड देणे गरजेचे आहे.

आहाराला औषध बनवा

संशोधनानुसार अन्नघटक हे शरीरावर दिवसातून तीन वेळा परिणाम करत असल्याचे आढळून आले आहे. काही अन्नघटक कर्करोग वाढीला, तर काही घटक कर्करोग पेशींना प्रतिबंध करतात. त्यामुळे कर्करोगविरोधी अन्नघटकांचा आहारात समावेश केल्यास त्याचा फायदा होतो. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून प्रतिकारशक्तीला चालना देणारा आहार हा एकप्रकारे औषध म्हणून काम करतो. ॲण्टिऑक्सिडंट, करक्युमीन, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, बी, सी, प्रोटिन, ओमेगा-३, ६ आदी घटक असलेल्या अन्नाचा आहारात समावेश केल्यास हा आहारच औषध ठरतो आणि घेत असलेल्या उपचारपद्धतीला फायदा होतो.

जीवनशैली बदला

डॉ. ऑटो वारबर्ग यांच्या मते शरीर ॲसिडिकऐवजी अल्कलाईन असल्यास कोणताही आजार होत नाही. कर्करोगासारख्या आजाराचाही यापुढे टिकाव लागत नाही. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी शरीर ॲसिडिक राहणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी चुकीच्या जीवनपद्धतीत बदल करायला हवा, कर्करोग होण्यात चुकीची जीवनशैली हा महत्त्वाचा घटक असल्याचे डॉ. डेव्हिड श्रपचर यांनी संशोधनाद्वारे मांडले आहे, तर आपली शारीरिक कामे आणि आहार यात साधे आणि छोटे बदल जरी केले तरी कर्करोगापासून ४० टक्के बचाव करता येईल, असा जागतिक कर्करोग संशोधन परिषदेने निष्कर्ष मांडला आहे.

अतिताण, सतत नैराश्यात राहणे, संतापाची भावना, दुःख, भीती, स्वत:चा तिरस्कार, स्वत:ला शिक्षा करणे, नकारात्मक विचारात राहणे, भावनांचा कोंडमारा करणे, जीवनाविषयी अनास्था, प्रेमाचा अभाव आदी नकारात्मक बाबीही आजारांना शरीरात शिरकाव करण्यास साहाय्य करतात, त्यामुळे मनात नकारात्मक विचार आल्यास करून सकारात्मक विचारांचे वळण लावायला हवे.

ध्यान, योग, व्यायाम

सकारात्मक दृष्टिकोन, मनोबल, तसेच रोगप्रतिकार शक्तीच्या वाढीसाठी ध्यान, योग, प्राणायाम, व्यायाम उपयुक्त ठरतो, व्यायामाद्वारे ४० टक्के कर्करोग नियंत्रणात राहतो, संशोधनातून सिद्ध झाले आहे. कर्करोगावर उपचार करताना अथवा घेताना अनेक पाश्‍चात्त्य वैद्यकीय तज्ज्ञांनी ध्यान, योग, प्राणायामना आधार घेतला आहे.

इमॅजिनेशन पद्धतीचाही कर्करोगावर उपचार करताना वापर केला जातो. डॉ. बनी सिमेल हे रुग्णांवर उपचार करताना त्यांना आजारातील स्थितीवर चित्र काढायला लावतात. मनाच्या पटलावर बरे होत असल्याची प्रतिमा निर्माण करणे, शरीरातील पेशींना सकारात्मक संदेश जाऊन त्याद्वारे आजारावर मात करता यावी, यासाठी वापर केला जातो.

हे टाळावे

  • नशा देणारे व्यसन

  • उत्तेजक पेय

  • विषारी अन्नघटक असलेले अन्न

  • शरीर सतत ॲसिडिटी असणे

  • व्यायामाचा अभाव

  • आजाराकडे यांत्रिकतेने पाहणे

  • नकारात्मक विचारात जगणे

  • भूतकाळातील दुःख, भविष्यातील चिंतेत राहणे

  • घडलेल्या घटना सोडून न देणे

  • सतत तणावग्रस्त राहणे

देशातील कर्करोगग्रस्त रुग्ण - १४,६१,४२७

पुरुष रुग्ण - सात लाख १२ हजार १७६

महिला रुग्ण - सात लाख ४९ हजार ७२५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com