हेल्दी डाएट : हिवाळ्यासाठी सूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soups in Winter

हेल्दी डाएट : हिवाळ्यासाठी सूप

- डॉ. रोहिणी पाटील

थंडीच्या दिवसात सूप शरीर उबदार ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. सर्दी किंवा फ्लूशी लढण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, कारण त्यात भरपूर पोषक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिवाळ्याच्या हंगामात सूप आरोग्यदायी असतात, कारण ते ताजे घटक वापरून बनवता येतात आणि त्यात फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामध्ये फायबरही अधिक असते, जे तुमच्या शरीराला बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.

हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी सूप हा एक उत्तम मार्ग आहे. हे बनवणे सोपे आहे, ते शरीराला आराम देणारे आणि उबदार आहे आणि याचा आनंद अनेक प्रकारे घेता येतो. सूपाबद्दल सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्यात आपल्या आवडीनुसार बदल करणे सहज शक्य आहे. तुमच्या हातात किंवा आठवडाभरापासून शिल्लक असलेल्या काही भाज्या असतील त्या घेऊन त्यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती आणि मसाले तुम्ही घालू शकता आणि तुमचा स्वतःचा असा वेगळा स्टॉक देखील बनवू शकता!

असे बरेच सुपाचे प्रकार आहेत, जे तुम्हाला हिवाळ्यातील आजारांवर मात करण्यास आणि या हंगामात निरोगी राहण्यास मदत करू शकतात. इथे एक उदाहरणे दिले आहे.

भोपाळ्याचे सूप

साहित्य

 • २५० ग्रॅम भोपळा

 • १ मध्यम चिरलेला कांदा

 • १ कप पाणी

 • २ लहान लसणाच्या पाकळ्या

इतर साहित्य

 • १ टीस्पून ओरेगॅनो पावडर

 • २-३ चमचे ऑलिव्ह तेल

 • रॉक सॉल्ट/ सैंधव आवश्यकतेनुसार

 • गार्निशसाठी आवश्यकतेनुसार काळी मिरी पावडर

 • २ चमचे ताजी कोथिंबीर चिरलेली

 • २ टेबलस्पून किसलेले चीज

कृती

 • भोपळा शिजवणे

 • भोपळा सोलून स्वच्छ धुवा आणि त्याचे चौकोनी तुकडे करा.

 • कांदा आणि लसूण पाकळ्या चिरून घ्या.

 • प्रेशर कुकरमध्ये १ कप पाणी घालून वरील सर्व साहित्य त्यात घाला.

 • भरडीप्रमाणे हवे असल्यास कमी पाणी घाला.

 • प्रेशर कुकर झाकून मध्यम आचेवर सुमारे ८-९ मिनिटे (५-६ शिट्ट्या येईपर्यंत) शिजवा.