आरोग्यमंत्र : हृदयविकाराचा झटका विरुद्ध अकस्मात मृत्यू

‘तो काम करत असताना अचानक कोसळला आणि क्षणार्धात त्याचा श्वास थांबला. तो जागेवरच मृत्युमुखी पडला,’
Heart Attack
Heart AttackSakal
Summary

‘तो काम करत असताना अचानक कोसळला आणि क्षणार्धात त्याचा श्वास थांबला. तो जागेवरच मृत्युमुखी पडला,’

‘तो काम करत असताना अचानक कोसळला आणि क्षणार्धात त्याचा श्वास थांबला. तो जागेवरच मृत्युमुखी पडला,’ ‘हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले,’ ही वाक्य तुमच्या कानावर कधी न कधी तरी पडली असतील.

अशावेळी आपल्या मनात पहिला विचार येतो की, हा तीव्र हृदयविकार असेल. प्रत्यक्षात तो हृदयविकाराचा झटका नसतो. तर, हृदयाची क्रिया अचानक बंद पडल्यामुळे मृत्यू झालेला असतो. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (एससीए) असे म्हणतात. हृदयविकाराचा तीव्र झटका आणि ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ हे वेगळ आहे. ‘एससीए’ हा जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. भारतात सुमारे २५ लाख रुग्णांना ‘एससीए’चा धोका आहे. ही घटना घडणाऱ्या एक टक्का रुग्णाचेही प्राण वाचविता येत नाही. त्यामुळे ‘एससीए’ही समस्या नेमकी काय आहे, आपल्या समोर अचानक एखादी व्यक्ती कोसळते, तेव्हा नेमकेपणाने काय करावे, याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. त्यातूनच आपण एखाद्याचे प्राण निश्चित वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो.

हृदयविकाराचा झटका आणि ‘एससीए’मधील फरक

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमनीमध्ये कोलेस्टेरॉलचा भाग अडकतो. त्यामुळे तेथे रक्ताची गाठ तयार होते. त्यातून हृदयाच्या स्नायूंना शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही. अशा वेळी रुग्णाला दरदरून घाम येतो, श्वास घेण्यासाठी त्रास होतो, छाती, हात, जबडा यात तीव्र वेदना होऊ लागतात. ही हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे असू शकतात. अशा रुग्णाला पहिल्या तासात योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता खूप जास्त असते.

‘एससीए’ म्हणजे काय?

हृदयाची क्रिया ही विद्युतीय भाग असतो. त्यात बिघाड झाल्यास हृदयाचे ठोके अनियमित होतात. काही रुग्णांमध्ये हे ठोके वाढतात, तर काहींमध्ये त्याचा वेग कमी होतो आणि अचानक हृदयाचे कार्य थांबते. त्याला वैद्यकीय परिभाषेत अरिथमेरिया म्हटले जाते. हृदय बंद पडल्याने शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव असलेल्या मेंदूचा रक्तपुरवठा विस्कळित झाल्याने रुग्ण बेशुद्ध पडतो. याच वेळी रुग्णाला वैद्यकीय मदत न मिळाल्यास त्याचे प्राण वाचविता येत नाहीत.

‘एससीए’चा धोका कसा ओळखाल?

  • रुग्ण अचानक बेशुद्ध पडतो. त्याच्या दोन्ही खांदे थोपटूनही त्याचा कोणताच प्रतिसाद नसतो.

  • रुग्णाचा श्वास कमी होणे

  • नाडी आणि रक्तदाब कमी होणे

तुम्ही काय करू शकता?

तुमच्या देखत अशा पद्धतीने कोणता रुग्ण अचानक कोसळल्यास तातडीने रुग्णवाहिकेला किंवा आपत्कालीन वैद्यकीय सेवेला फोन करा. ‘सीपीआर’ प्रशिक्षण घेतले असल्यास त्याला तातडीने मदत करा. योग्य प्रकारे दिलेल्या ‘सीपीआर’मधून रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाच्या शरीरात रक्ताभिसरण आणि अवयवांना प्राणवायू या माध्यमातून मिळतो.

कोणाला धोका असतो?

  • हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून बचावलेला रुग्ण

  • हृदयाची गती वाढलेला रुग्ण

  • हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर हृदयाची गती कमी झालेला रुग्ण

  • तुमच्या कुटुंबात यापूर्वी कोणाचा अकस्मात मृत्यू झाला असले तर धोका वाढतो

‘एससीए’ उपचारातील आव्हाने

आपल्या देशात ‘एससीए’बद्दल नागरिकांमध्ये जागृती नाही. वाहतूक कोंडीमुळे अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णालयापर्यंत पोचणे शक्य होत नाही.

प्रतिबंध आणि उपचार

  • ‘आयसीडी’ नावाचे एक उपकरण छातीच्या त्वचेखाली बसविले जाते. त्यातून हृदयाची गतीत होणारे बदल बारकाईने टिपले जातात.

  • जिवाला धोका निर्माण होईपर्यंत हृदयाची गती वाढल्यास हे उपकरण ती गती नियंत्रित करते. त्यातून अकस्मात होणारा मृत्यू टाळणे शक्य असते.

  • ही अत्यंत लहान छिद्रातून केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. शस्त्रक्रियेनंतर एक किंवा दोन दिवसांमध्ये रुग्ण घरी जातो. काही आठवड्यांमध्ये रुग्ण नियमित दैनंदिन व्यवहार सुरू करतो.

  • काही अद्ययावत उपकरणे अशी आहेत, की तुमच्या शरीरात झालेले बदल थेट तुमच्या डॉक्टरांना सांगतात. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत लवकर अचूक निदान आणि योग्य उपचार मिळणे शक्य होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com