आरोग्यमंत्र : तुम्ही आणि तुमची हृदयक्षमता

हृदयाची पंपिंगक्षमता कमी होणे म्हणजे पर्यायाने हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि हृदय कमकुवत होते. यालाच ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ असे म्हणतात.
Heart
HeartSakal
Summary

हृदयाची पंपिंगक्षमता कमी होणे म्हणजे पर्यायाने हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि हृदय कमकुवत होते. यालाच ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ असे म्हणतात.

हृदयाची पंपिंगक्षमता कमी होणे म्हणजे पर्यायाने हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि हृदय कमकुवत होते. यालाच ‘डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ असे म्हणतात. यामध्ये हृदयाचा आकार मोठा होतो आणि कमकुवत होते. कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदयविकाराचा झटका अथवा ॲटॅक नाही. डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचे एक कारण हे हार्ट ॲटॅक असू शकते. याव्यतिरिक्त बरीच कारणे असू शकतात. 

डायलेटेड कार्डिओमायोपॅथीची कारणे

  • मधुमेह

  • मद्यसेवन

  • अनुवांशिक कारणे

  • काही व्हायरल किंवा जंतूंचे रोग

  • पूर्वीचा हार्ट ॲटॅक इत्यादी.

डायलेटेड कार्डिओमायोपॅथीची लक्षणे

  • दम लागणे, थोडे पण चालल्यावर आडवे झोपल्यावर दम लागणे.

  • अतिशय जास्त प्रमाणात थकवा जाणवणे.

  • फुप्फुसांमध्ये पाणी साचणे. झोपताना एकापेक्षा जास्त उशा घेणे आणि न घेतल्यास दम लागणे.

  • पायावर आणि पोटावर सूज येणे. अनपेक्षितरित्या वजन वाढणे.

  • छातीमध्ये धडधड होणे अथवा ठोका चुकणे.

  • डोळ्यापुढे अंधारी येऊन चक्कर येणे.

  • भूक न लागणे 

हृदयाची पंपिंगक्षमता कमी होण्यामुळे रक्त हे पंप न झाल्यामुळे आत साचले जाते. हे साचलेले पाणी आणि रक्त हे फुप्फुसांवर दबाव निर्माण करून श्वासोच्छ्वास करण्यास अडथळा निर्माण करते. यामुळे दम लागण्याची प्रक्रिया चालू होते. 

उपचार

हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकत नाही; पण त्याची लक्षणे कमी होऊ शकतात. औषधोपचारांमुळे जगण्याचा दर्जा निश्चितच चांगला होऊ शकतो. या उपचारांमुळे पॅरालिसिस स्ट्रोक, दम लागण्याचे वाढलेले प्रमाण, हृदयाच्या झडपांचे आजार आणि अरिदमिया इत्यादींपासून बचाव होऊ शकतो. 

मूत्राचे प्रमाण वाढविणारी औषधे ज्यांना ‘डीयुरेटिक’ असे म्हणतात, ती बऱ्याच वेळेस दिली जातात. यामुले लघवीद्वारे शरीरातील पाणी बाहेर पडून हृदयावरील तणाव कमी होतो, फुप्फुसातील पाणी कमी होऊन दम लागण्याचे प्रमाण कमी होते. कधी कधी दिगोक्सिनसारखे औषधही दिले जाते, ज्यामुळे हृदयाची पंपिंगक्षमता वाढण्यास मदत होते. आर्नी, एस इन्हिबिटर, बीटा ब्लॉकर इत्यादी औषधांनी दूरगामी परिणाम होऊन फायदा होतो. जर अरिदमिया असेल, तर त्यासाठी अम्योड्रॉनसारखी औषधे दिली जातात. कार्डियाक अरेस्ट असेल, तर त्यांना आयसीडी, सीआरटीडी पेसमेकर बसवावा लागू शकतो. यामुळे हृदयाची क्षमता वाढण्यास मदत होते. 

डायलेटेड कार्डिओमायोपॅथी पूर्णपणे बरा करायचा असेल, तर त्याला हार्ट ट्रान्स्प्लांट अथवा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागते. यामध्ये दुसरे हृदय बसविले जाते. 

याव्यतिरिक्त, नियमित व्यायाम करणे, जेवणात मीठ कमी घेणे, आपल्या वजनावर नियंत्रण ठेवणे, पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन नियंत्रितरित्या करणे, आपली औषधे नियमितपणे घेणे आणि मद्यपान कमी करणे याचे पालन केल्यास डायलेटेड कार्डिओमायोपॅथीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com