संवाद : टाइप-२ : डायबेटिस रिव्हर्सिबल आहे का?

भारतात सर्वाधिक रुग्ण असणारा ‘टाइप-२ डायबेटिस’ (मधुमेह) पूर्ववत करता येतो का, हा आता सर्वत्र चर्चेचा विषय आहे.
diabetes reversible
diabetes reversiblesakal

भारतात सर्वाधिक रुग्ण असणारा ‘टाइप-२ डायबेटिस’ (मधुमेह) पूर्ववत करता येतो का, हा आता सर्वत्र चर्चेचा विषय आहे. तीन महिन्यांचे रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण (एचबीए१सी) तपासून मधुमेह नियंत्रित आहे की, नाही याचे निदान केले जाते.

औषधांशिवाय ‘एचबीए१सी’ ६.५ पेक्षा कमी असल्यास त्याला रिव्हरसलब डायबेटिस म्हणतात. रिव्हरसब डायबेटिस कोणत्या प्रकारे होते? हा प्रश्न सातत्याने रुग्णांकडून विचारला जातो. गेल्या काही वर्षांत आहाराच्या आधारे डायबेटिस रिव्हरसलब ‘डिरेक्ट’ नावाच्या एक वैद्यकशास्त्रीय अभ्यास झाला आहे.

आहार नियंत्रित करून आणि योग्य प्रकारच्या आहाराची निवड करून मधुमेह पूर्ववत नियंत्रित आणता येतो का, हा या अभ्यासामागचा मुख्य उद्देश होता. सलग सहा आठवडे ७०० ते ८०० कॅलरीज जास्त प्रथिने (प्रोटीन) असलेला आहार घेतल्यास मधुमेह नियंत्रणात आणता येऊ शकतो, असे यातून अधोरेखित झाले आहे.

तसेच, मेटॅबोलिक आणि दुर्बिणीच्या साहाय्याने केलेल्या बेरियाट्रिक शस्त्रक्रियेतूनही मधुमेह नियंत्रणात आणला जातो, हे वेगवेगळ्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. या प्रकारच्या शास्त्रशुद्ध उपचारांचा जगभरातील मधुमेह नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश केला आहे.

परंतु मधुमेहाच्या नेमक्या कोणत्या रुग्णावर हे उपचार केले जातात, म्हणजेच ‘कोणी डायबेटिस रिव्हरसबल’ करावा या बाबत रुग्णांमध्ये उत्सुकता जाणवते. मधुमेहाला सुरवात होऊन पाचपेक्षा कमी वर्षे झाली असतील त्यांनी या उपचाराचा विचार करावा.

कारण, सुरवातीच्या पाच वर्षांच्या आत तो जर रिव्हरसबल केला तर, त्यामुळे भविष्यात रुग्णावर होणारे मधुमेहाचे दुष्परिणाम निश्चितच कमी होतात. डोळे, रक्तवाहिन्या, हृदय, मूत्रपिंड अशा वेगवेगळ्या अवयवांवर मधुमेहाचा दूरगामी परिणाम होत असतो. तो यातून टाळणे शक्य होते.

थोडक्यात, मधुमेहाच्या पहिल्या पाच-सहा वर्षांमध्ये डायबेटिस रिव्हरसलबचे उपाय करणे उपयुक्त ठरते. रुग्णाच्या मधुमेहाची वर्षे जस-जशी वाढतील तस-तसा स्वादूपिंडाच्या कार्यक्षमतेवर थेट दुष्परिणाम सुरू होतो. जास्त वर्षांच्या मधुमेह असल्यास दुर्बिणीतून मेटाबोलिक सर्जरी करून डायबेटिस रिव्हरसलब हे प्रभावी ठरते. आहारातून मधुमेह नियंत्रण अवघड असते. त्यासाठी कमी उष्मांकाचा आहार घ्यावा लागतो.

परंतु त्यासाठी काही औषधे देऊन रुग्णाची भूक कमी केली जाते. त्यातून आहार नियंत्रित करता येतो. त्याचा उपयोग आपण मधुमेह नियंत्रणासाठी निश्चित करू शकतो. काही वर्षांसाठीही मधुमेह नियंत्रित राहिला तरीही त्याचा फायदा पुढील काही वर्षे रुग्णाला त्यामुळे होणारे वेगवेगळे विकार (मेंदू विकार, नसांचे विकार, इत्यादी) टाळण्यासाठी होऊ शकतो.

‘डायबेटिस रिव्हरसबल’ हा शब्द आता खूप रुग्णांच्या बोलण्यात येत आहे. त्यामुळे मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णाला हा पर्याय उपलब्ध झाला पाहिजे. रुग्णांनीही त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. विशेषतः ज्यांचा मधुमेह औषधांनी नियंत्रित होत नाही. पोट मोठे आहे. तसेच, मधुमेहामुळे हृदयविकार, मूत्रपिंड विकार झाले आहे. अशा रुग्णांनी आहार, औषधे किंवा दुर्बिणीतून शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मधुमेह नियंत्रणाचा विचार नक्की करावा. ही आता काळाची गरज आहे.

(लेखक बेरियाट्रिक सर्जन, एलओसी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com