durva
sakal
- डॉ. मालविका तांबे
भारतीय पौराणिक कथांमध्ये एक कथा आहे की, श्रीगणेशांचे अनलासूर या राक्षसाशी युद्ध झाले होते. श्रीगणेशांनी राक्षसाला गिळून टाकले, त्यामुळे राक्षसाचा पराभव तर झाला, परंतु श्रीणेशांच्या पोटात आग आग होऊ लागली. अनेक उपाय केले, परंतु आग शमत नव्हती. श्रीगणेशांना दूर्वांचा रस प्यायला दिल्यावर त्यांच्या पोटातील आग शांत झाली. तेव्हापासून दूर्वा ही वनस्पती श्रीगणेशांना प्रिय झाली.