Heart Blockage Symptoms: ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणं ओळखा अन् घरबसल्या 'या' 3 सोप्या पद्धती वापरून वाचवू शकता जीव!
Blockage Symptoms Treatment: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना हृदयविकाराचा धोका वाढत चालला आहे. मात्र प्रत्येकवेळी रुग्णालयात जाऊन तपासणी करणे शक्य होत नाही. म्हणूनच काही साध्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे
Heart Blockage: आजकालची धावपळीची, तणावपूर्ण आणि असंतुलित जीवनशैली हृदयासाठी अतिशय घातक ठरत आहे. सततचा मानसिक ताण, अनियमित व अयोग्य आहार, आणि शारीरिक हालचालींचा अभाव या सगळ्यांचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो.