Cholesterol Control: लाल कांदा खा आणि Cholesterol करा कमी

how to reduce cholesterol naturally: घराघरातील किचनमध्ये जेवणासाठी लागणारा लाल कांदा तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो. कच्च्या लाल कांद्यामध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणारे गुणर्धम असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे
How to reduce cholesterol naturally
How to reduce cholesterol naturallyEsakal

How to reduce cholesterol naturally: बदलती जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अलिकडे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. कोलेस्ट्रोल वाढल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. शिवाय हार्ट अटॅकची Heart Attack चिंता वाढली आहे.

यासाठीच अनेकजण कोलेस्ट्रॉल Cholesterol नियंत्रणात राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. Eat Red onion to Reduce and Control Cholesterol in Blood

मग वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक डाएट करण्यापासून ते कमी तेलकट पदार्थ खाणं किंवा काही घरगुती उपाय करत आहेत. अशावेळी तुमच्या किचनमध्ये Kitchen हमखास उपलब्ध असलेला एक पदार्थ तुमचं कोलेस्ट्रॉल सहज कमी करू शकतो हे तुम्हाला कळायला हवं.

घराघरातील किचनमध्ये जेवणासाठी लागणारा लाल कांदा तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो. कच्च्या लाल कांद्यामध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणारे गुणर्धम असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे. कच्च्या लाल कांद्याच्या मदतीने तुम्ही कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रणात आणू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कांद्यामुळे शरिरातील गुड कोलेस्ट्रॉल तयार होवून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर पडतं. त्यासोबतच कांद्याच्या सेवनामुले हृदय विकाराचा धोका कमी होतो. कांद्यामधील गुणधर्म LDL कोलेस्ट्रॉलमधील चांगली तत्व काढून ती लिवरपर्यंत पोहचवण्याचं काम करतात.

कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचे एक महत्वपूर्ण संयुग आढळतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. कांद्याच्या सेवनानमुळे सूज कमी होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्या मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे जास्त कोलेस्ट्राल असलेल्या लोकांसाठी कच्च्या लाल कांद्याचं सेवन उपयुक्त ठरतं.

हे देखिल वाचा-

How to reduce cholesterol naturally
Summer Tips : उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

कांद्यामधील पोषक तत्व

कांद्यामधील पोषक तत्वांचा विचार करता यात विटामिन ए, सी आणि ई मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. त्याचप्रमाणे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर, कार्बोहाइड्रेट, क्वेपसेटिन आणि प्रोटीन अशी महत्वाची पोषक तत्व असतात.

कांद्याचं सेवन हे मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तसचं त्वचा आणि केसांच आरोग्य सुधारण्यासही फायदेशीर ठरतं.

  • कांदा खाणाऱ्या लोकांची तुलना इतर कांदा न खाणाऱ्या लोकांशी करता त्यात कांदा खाणऱ्यांमध्ये ११ ते २० टक्के कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी आढळलं. 

  • कांद्यामध्ये पॉलिफेनोलिक संयुगाची चांगली मात्र आढळते.हे तुमच्या हृदयासाठी फायदेशीर असतं. शिवाय यात एंटी-इंफ्लामेटरी गुण, अँडीऑक्सिडंट आणि कॅन्सरविरोधी क्षमता असते. 

  • याशिवाय कांदा हे सगळ्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स १० पेक्षा कमी आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठीदेखील कांद्याचं सेवन उपयुक्त ठरतं. 

  • कांद्यामध्ये कार्ब्सचं प्रमाणही अत्यंत कमी असतं त्यामुळे तुमच्या संपूर्ण हृदयाच्या आरोग्यासाठी कांदा गुणकारी आहे.

कांद्याचे इतर गुणकारी फायदे

  • कांद्याचा आहारात समावेश केल्यास पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.

  • कांद्यामधील अँटी-बॅक्टेरियल गुण हे बॅक्टेरियाशी संबधीत इतर धोक्यांपासून शरीराचं संरक्षण करण्यास मदत तकरतात.

  • तसचं कच्च्या कांद्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते.

कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी कच्चा लाल कांदा गुणकारी असल्याने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्याचा आहारात समावेश करू शकता. यासाठी तुम्ही सलाड किंवा सॅण्डविचमध्ये कच्चा कांदा वापरू शकता. त्यासोबत एखाद्या चटणीसोबत कांदा खावू शकता. कच्च्या कांद्याची मीठ आणि लाल तिखट मिसळून केलेली चटणी जेवणासोबत तोंडी लावायला घेऊ शकता. 

कच्चा कांदा हा कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी मदत करत असला तरी योग्य जीवनशैली आणि योग्य आहार तसचं नियमित व्यायाम करणं हे देखील तितकच महत्वाचं आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com