esakal | धोक्याची घंटा! मोबाईलचा विळखा; मुलांना सांभाळा
sakal

बोलून बातमी शोधा

Prefer old mobile instead of new one for online education

धोक्याची घंटा! मोबाईलचा विळखा; मुलांना सांभाळा

sakal_logo
By
महेश काशीद

कोरोनामुळे (covid 19) गेल्या दीड ते दोन वर्षापासून शाळा आणि महाविद्यालये (Schools and colleges)बंद आहेत. मात्र, ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविले जात आहे. यामुळे मोबाईलबाबत अनभिज्ञ असलेल्या विद्यार्थ्यांच्या हाती आता महागडे स्क्रिन टच मोबाईल आले आहेत. सरासरीपेक्षा अधिक वेळ मोबाईल आणि लॅपटॉपवर मुले खिळून राहत असल्याचे दिसून येत आहे.

सतत मोबाईल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे त्याची मुलांना सवय जडत आहे. काही संदर्भात पालकांनी मुलांना मोबाईल न दिल्यास चिडचीड, राग येण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. शिक्षणासाठी मुलांच्या हाती सुरुवातीला मोबाईल दिला जातो. त्यातून मुले शिक्षणावर आधारीत व्हिडिओ बघतात. त्यानंतर मात्र मुले सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. खासकरून यू-ट्यूब, फेसबुकसह तत्सम ॲपवरील व्हिडिओ बघण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. सतत मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप बघण्याने विकार वाढल्याचे आढळून आले आहेत.

मुलांमध्ये मोबाईलचे आकर्षक का?

सामान्यपणे मुले रंग, आकर्षित चित्र किंवा एखादी विशिष्ठ वस्तू पाहून आकर्षित होतात. कार्टून, चित्रासह निघणारा प्रकाश त्यांना खूप आवडतो. यामुळे मुले मोबाईलला जवळ करत आहेत. सतत एका खेळण्याप्रमाणे त्याच्याशी एकरुप होत असून यातून त्यांना त्याची सवय जडत आहे. मोबाईलमधील आवाज आणि स्पर्श मुलांना खूप आवडतो. यामुळे लहानग्यापासून शालेय विद्यार्थ्यांत मोबाईलचे आकर्षण वाढत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम

डोळ्यांचे विकार जडणे, डोळ्यांत कोरडेपणा दिसणे, निद्रानाश

डोळ्यांत जळजळ, नस कमजोर पडणे

चिडचिडेपणा वाढणे, राग येणे

लठ्ठपणा वाढणे

मानसिक पातळीवर अस्थैर्य

अभ्यासाकडे लक्ष न लागणे

मोबाईल लहरीमुळे शरीरावर परिणाम

लवकर चष्मा लागणे

डोके दुखणे

मोबाईलपासून अलिप्त ठेवण्यासाठी काय करता येईल?

मुलांना मोबाईल देताना वेळेचे बंधन घालावे

रात्री उशिरापर्यंत मुलांच्या हाती मोबाईल न देणे

मैदानी खेळासाठी मुलांना प्रोत्साहित करणे

योग साधना, ध्यानधारणा वाढविणे

मुलांशी नियमित संवाद साधावा

मुलांना मनोरंजनात अधिक गुंतवून ठेवावे

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना लवकर विकार जडतात. कोवळे शरीर विकसित होण्याच्या मार्गावर असतानाच मुले सतत मोबाईलवरील घातक लहरींच्या संपर्कात आल्यास डोळ्यांची नस कमजोर पडते. चष्मा लवकर लागण्यासह मान आणि पाठदुखीचे विकार उद्‍भवतात. याबाबत राज्यात अलीकडे काही वैद्यकीय संस्थांनी अभ्यास केला असून, त्यातून हे अधोरेखित झाले आहे. दीड वर्षापूर्वी झालेल्या शाळेतील नेत्र तपासणी शिबिरात मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे.

-डॉ. चांदनी, जिल्हा नेत्रतज्ज्ञ अधिकारी

loading image