
डॉ. मृण्मयी मांगले
आज आपण जुनाट आजारांबद्दल एक अत्यंत वेगळाच; पण महत्त्वाचा पैलू पाहणार आहोत तो म्हणजे आपल्यातला ‘मी’पणा म्हणजेच अहंकार आणि जुनाट आजारांमधील कनेक्शन. आपण ‘मी पणा’ सोडून देऊ शकलो तर कसे जुनाट आजार होण्याची संभावना कमी होते; तसेच असलेले आजार वाढतही नाहीत हेही आपण पाहूया. हे माझे वैयक्तिक मत नाहीये. आता या धर्तीवर वैज्ञानिक रिसर्च होत आहेत- ज्यामध्ये आपणच आपल्या अहंकारी वृत्तीमुळे नकळतपणे स्वतःला आजार करवून घेतो ही बाब सिद्ध होत आहे.