
महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक
मुलांना जास्तीत जास्त शारीरिक व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. असे व्यायाम केवळ खेळाडू किंवा ॲथलिट यांनीच करावे असे नाही. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल सुरक्षितपणे आणि इजा न होता करणे आवश्यक असते आणि त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये, क्षमता आणि शारीरिक कंडिशनिंगची पातळी राखणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला स्ट्रेंथ ट्रेनिंगबद्दल आपल्या मनात गैरसमज आणि चुकीच्या संकल्पना असतात, म्हणून आपण त्या ट्रेनिंगला प्राधान्य देत नाही. माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवातून मी लोकांचे हे समज दूर केले आहेत. आज आपण अशाच काही गैरसमजुती आणि त्यातील तथ्ये याबद्दल माहिती घेऊया.