
पुणे : सशक्त गर्भधारणा व पुनरुत्पादक क्षमता विकसित होण्यासाठी स्त्रियांच्या शरीरात पुरेसे व्हिटॅमिन डी, बीट्वेल, फॉलिक अॅसिड हे जीवनसत्वे गरजेचे आहेत. त्याच्या अभावी त्यांच्यामध्ये ‘अँटी-म्युलेरियन हार्मोन’ (एएमएच) हे संप्रेरक प्रभावित होते व गर्भधारणेवर परिणाम होता. गर्भधारणेचे नियोजन करत असलेल्या महिलांनी शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी तपासून घ्यावी. तसेच, २५ ते ३५ वयोगटातील महिलांनी ही जीवनसत्वे असलेला आहार घ्यावा, असे आवाहन वंध्यत्व व प्रसूतीतज्ज्ञांनी केले आहे.